Sanjay Raut News: ही शिवसेना नसून मोदी शहांची सेना आहे....; जाहिरातीवरुन राऊतांचा शिंदेना टोला

Sanjay Raut on Advertisement: संजय राऊतांनी देखील या जाहिरातीवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
Sanjay Raut News
Sanjay Raut NewsSaam TV
Published On

Maharashtra Political News: आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांनी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. अशात आज सर्वच वृत्तपत्रांवर शिवसेना- भाजपची जाहिरात झळकली. ही जाहिरात पाहून राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. संजय राऊतांनी देखील या जाहिरातीवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. (Latest Sanjay Raut News)

महाराष्ट्रामध्ये युतीच्या काळात राजकारणातील विरोध महाराष्ट्रात होतात. त्यामुळे महाराष्ट्राला विरोधाचे वावडे नाही. ही जाहिरात सरकारची आहे की खाजगी आहे हे आम्हाला माहित नाही. जाहिरात सरकारी असेल तर त्याच्यावरती भारतीय जनता पक्षाने उत्तर द्यायला हवं. जाहिरात सरकारची असेल तर 105 आमदार असलेल्या पक्षाच्या पाठिंब्यावर हे सरकार उभे आहे. त्याच्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस या सगळ्यांनी उत्तर दिले पाहिजे, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे.

Sanjay Raut News
Akola Crime News: धक्कादायक! त्याने तिचे फोटो कॅमेऱ्यात कैद केले; मग व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार

जाहिरातीसाठी सरकारच्या तिजोरीतील पैसे वापरले?

संजय राऊतांनी पुढे म्हटलं आहे की, "सगळ्या वृत्तपत्रांवर कोट्यावधी पैसे खर्च करून फक्त एका सर्वेची जाहिरात देण्यात आली. ते कोट्यावधी रुपये सरकारचे आहेत. सरकार तिजोरीतील आहेत, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

हा सर्वे नक्की कुठे केला गेला? महाराष्ट्रातला हा सर्वे आहे असं मला वाटत नाही. एक तर हा सर्वे सरकारी बंगल्यात केला असावा. मुख्यमंत्र्यांच्या तिकडल्या बंगल्यापुरता हा सर्वे असावा किंवा गुजरातमध्ये केलेला असावा, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

Sanjay Raut News
Cyclone Biparjoy: घरातून बाहेर पडण्याआधी रेल्वेचे वेळापत्रक तपासा; ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे ६७ रेल्वे रद्द

आनंदाच्या क्षणी तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना विसरलात

फक्त या सर्व कोट्यावधीच्या जाहिरात बाजीमुळे स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार मानणाऱ्या लोकांनी मोदींचा फोटो टाकलाय. पण बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो टाकला नाही म्हणजे ही सेना कोणाची आहे? मोदी सेनेत जर तुम्हाला इतका आनंद झाला तर या आनंदाच्या क्षणी तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना विसरलात. बाळासाहेब ठाकरे यांचा साधा उल्लेख देखील केला नाही, अशी खंत देखील राऊतांनी व्यक्त केली आहे.

शिवसेना नसून मोदी शहांची सेना

जाहिरातीवरुन (Advertismnet) शिंदेवर टीकास्त्र सोडत संजय राऊतांनी म्हटलं की, "बाळासाहेबांचा उल्लेख नाही म्हणजे ही शिवसेना शिवसेना नसून मोदी शहांची सेना आहे हे स्पष्ट होते. रोज पोपटपंची सुरू आहे आज त्यांचा मुखवटा समोर आला आहे. ही मोदी सेना आहे ही मोदींच्या टाचे खालची सेना आहे, असं राऊत म्हणाले.

काय आहे जाहिरातीमध्ये?

राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे, अफाट प्रेम मिळते आहे जनतेचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळालं आहे.

मतदान सर्वेक्षणानुसार भारतीय जनता पक्षाला 30.2% आणि शिवसेनेला 16.2% जनतेने कौल दिला. म्हणजेच महाराष्ट्रातील 46.4% जनता भाजप आणि शिवसेनेच्या या युतीला पुन्हा सत्तेवर आणासाठी इच्छुक आहे. मुख्यमंत्रीपदाच्या सर्वेक्षणानुसार, एकनाथजी शिंदे यांना महाराष्ट्रातील 26.1% जनतेला पुन्हा मुख्यमंत्रीपदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांना 23.2% जनतेला मुख्यमंत्रीपदी पाहायचे आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील 49.3% जनतेने पुन्हा या जोडीला पसंती दर्शविली. महाराष्ट्रातील जनतेचे खूप खूप आभार.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com