Sangli Politics Shivsena Thackeray Group Vs Congress:  Saamtv
महाराष्ट्र

Sangli Politics: 'पुन्हा विश्वासघात होणार', सांगलीत काँग्रेसशी युती नको, विशाल पाटलांविरोधात ठाकरे गट आक्रमक; मविआत ठिणगी?

Sangli Politics Shivsena Thackeray Group Vs Congress: लोकसभेला काँग्रेसने साथ न दिल्यामुळे आता विधानसभेला जिल्ह्यामध्ये काँग्रेसशी युती नकोच, अशी थेट मागणी सांगलीचे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी केली आहे.

विजय पाटील

सांगली, ता. १९ ऑगस्ट २०२४

लोकसभेनंतर विधानसभेलाही सांगली जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापणार असल्याचे दिसत आहे. सांगलीमध्ये लोकसभेला काँग्रेस अन् शिवसेना ठाकरे गटामध्ये उमेदवारीवरुन सामना झाल्याचे पाहायला मिळाले होते. ठाकरे गटाने उमेदवार दिल्यानंतरही काँग्रेसच्या विशाल पाटलांनी अपक्ष मैदानात उतरत खासदारकी मिळवली. लोकसभेला काँग्रेसने साथ न दिल्यामुळे आता विधानसभेला जिल्ह्यामध्ये काँग्रेसशी युती नकोच, अशी थेट मागणी सांगलीचे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी केली आहे.

लोकसभेनंतर विधानसभेतही घमासान!

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच सांगली जिल्ह्यामधील राजकारण तापले आहे. सांगलीमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला असून काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटलांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभूती यांनी केली आहे.

काँग्रेस- ठाकरे गटामध्ये वाद रंगला!

तसेच सांगली जिल्ह्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून पुन्हा विश्वासघात होणार असल्याचे स्पष्ट संकेत खासदार विशाल पाटलांनी दिलेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत सांगली जिल्ह्यात काँग्रेस सोबत आघाडी नको,अशी मागणी देखील संजय विभूते यांनी केली आहे. संजय विभूते यांच्या मागणीमुळे आगामी काळात काँग्रेस अन् ठाकरे गटामध्ये जोरदार वाद वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान,खासदार विशाल पाटलांनी खानापूर-विटा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. तसेच उद्धव ठाकरेंच्या निदर्शनास देखील विशाल पाटलांची भूमिका आणून देणार असल्याचे संजय विभुतेंनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता सांगली विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस असा संघर्ष पुन्हा उफाळून येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT