Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Maharashtra Political News saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: वर्धा लोकसभेवरुन महायुतीत पेच! अजित पवार गटानंतर शिंदे गटही सरसावला; भाजपची डोकेदुखी वाढणार?

Gangappa Pujari

चेतन व्यास, वर्धा|ता. ५ फेब्रुवारी २०२४

Wardha Loksabha Election 2024:

सध्या भारतीय जनता पक्षाकडे असलेल्या वर्धा लोकसभा मतदार संघावर शिवसेना शिंदे गटानेही दावा ठोकला आहे. वर्धा लोकसभा निवडणूक शिवसेना शिंदे गटाने लढवावी, अशी मागणी जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतून करण्यात आली आहे. ही मागणी वरिष्ठांपर्यंत पोहोचवणार असून वरिष्ठ याबाबतचा निर्णय घेतील, अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वर्धा लोकसभेसंदर्भात शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत वर्धा लोकसभा मतदार संघ शिवसेना शिंदे गटाने लढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शिवसेना पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख किरण पांडव तसेच माजी राज्य मंत्री,, जिल्हा संपर्क प्रमुख अशोक शिंदे यांनी उमेदवार म्हणून लोकसभेची निवडणूक लढवावी अशी मागणी पदाधिकारी, व कार्यकर्त्यांनी केली.

पदाधिकाऱ्यांची मागणी वरिष्ठांकडे कळवण्यात येतील.याबाबतचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील, अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, याच जागेवर याआधी राष्ट्रवादी अजित पवार गटानेही दावा केला आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वर्ध्यात जाणता राजा महानाट्याची तयारी...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासनाच्यावतीने शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित ‘जाणता राजा’ महानाटयाचा प्रयोग वर्ध्यामध्ये होणार आहे. 6 ते 8 फेब्रुवारी या कालावधीत स्वावलंबी मैदान येथे या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

SCROLL FOR NEXT