Nagpur Ajit Pawar Banner Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur Ajit Pawar Banner: ‘वचनाचा पक्का अन् मुख्यमंत्रीपदासाठी पक्का’; सासूरवाडीनंतर नागपुरात झळकले अजितदादांचे बॅनर्स

Ajit Pawar Banner News: नागपुरातील हे बॅनर्स पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nagpur News: गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांची (Ajit Pawar) राज्याच्या राजकारणामध्ये तुफान चर्चा आहे. या सर्व चर्चांवर अजित पवारांनी प्रतिक्रिया देत पडदा टाकला होता. मात्र आता पुन्हा एकदा अजित पवार चर्चेत आले आहेत. याचे कारण म्हणजे नागपुरात झळकलेले बॅनर आहे. (Latest Marathi News)

या बॅनरवर ‘वचनाचा पक्का, हुकमाचा एक्का मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादाचं पक्का’ असे लिहिले आहे. या बॅनरवर शरद पवार, प्रफुल्ल पटेल यांचे फोटो लागला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी बॅनर लावल्याची माहिती समोर येत आहे. नागपुरातील लक्ष्मीभवन चौक आणि इतर परिसरात हे बॅनर लावण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. नागपुरातील (Nagpur) हे बॅनर्स पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सासूरवाडीत झळकले अजित पवारांचे बॅनर

पुण्यातील कार्यक्रमात मुख्यमंत्री होणार असल्याची इच्छा व्यक्त केली होती. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या या वक्तव्यानंतर पुण्यात जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून बॅनरही झळकले होते. यानंतर काल अजित पवारांच्या सासूरवाडीत भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले. धाराशीव जिल्ह्यातील तेर ही अजित पवार यांची सासूरवाडी आहे. तेरच्या चौकाचौकात हे बॅनर्स झळकले. या बॅनर्सवर अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचेही फोटो होता. (Maharashtra Politics)

अशातच आता राज्याच्या उपराजधानीतंही अजित पवार हेच ‘भावी मुख्यमंत्री’ असे होर्डिंग्ज झळकल्याचे पाहायला मिळाले. यावर ‘वचनाचा पक्का, हुकमाचा एक्का मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादाचं पक्का’ असे लिहिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

पुण्यात झळकले होते बॅनर...

काही दिवसांपूर्वी सकाळ माध्यम समूहाकडून अजित पवार यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. 'दिलखुलास दादा' या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा दर्शवली. त्यानंतर पुण्यातील (Pune) थेट कोथरुड परिसरात म्हणजेच भाजपच्या बालेकिल्ल्यात 'जनतेच्या मनातला मुख्यमंत्री' असा उल्लेख असणारे बॅनर्स लागले आणि आता पुन्हा त्यांच्या सासरवाडीत अशाच आशयाचे बॅनर्स लागल्याने लेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Safety Tips: गॅस- स्टोव्हच्या जवळ 6 वस्तू ठेवणे टाळा, वास्तुशास्तानुसार ठरू शकते घातक

Ginger Tea : रोज आल्याचा चहा पिता? थांबा! ५ गंभीर दुष्परिणाम वाचताच 'ही' सवय सोडाल

Postpartum diet: बाळंतपणानंतर वजन कमी करण्याची घाई नको; आधी शरीराला नेमकं काय हवं ते जाणून घ्या

Maharashtra News Live Update: शहाजी बापू पाटील यांचा अवघ्या 12 तासात घुमजाव

Vivekanand Patil: भाषणानं MPSC आंदोलन गाजवलं, महाराष्ट्रात चर्चा, कोण आहेत हे विवेकानंद पाटील?

SCROLL FOR NEXT