Maharashtra Politics Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'टायगर इज बॅक'...निलेश राणेंचे सिंधुदुर्गात शक्तीप्रदर्शन

Maharashtra Politics: निलेश राणे यांच्या स्वागतासाठी महामार्गावर ठिकठिकाणी टायगर इज बॅक अशा आशयाचे बॅनर लागले आहेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विनायक वंजारे

Maharashtra Politics

राजकीय निवृत्तीची घोषणा करून दोनच दिवसात ती मागे घेतल्यानंतर माजी खासदार निलेश राणे आज प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जिल्ह्यात त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी महामार्गावर ठिकठिकाणी टायगर इज बॅक अशा आशयाचे बॅनर लागले आहेत. सध्या हे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

निलेश राणेंचे मुंबई गोवा महामार्गावरील झाराप झीरो पॉईन्ट येथे जंगी स्वागत केल्यानंतर झारापवरून रॅली काढणार आहेत. ही रॅली कुडाळ भाजप कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे. कुडाळ येथे निलेश राणे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. गेल्या काही दिवसांत विरोधकांनी केलेल्या आरोपांना निलेश राणे सडेतोड उत्तर देण्याची शक्यता आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आणि कोकणातील भाजपचे नेते निलेश राणे यांनी दोनच दिवसांपूर्वी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली होती. राजकारणात आता मन रमत नसल्याचं ट्विट केलं होतं. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्तक्षेपामुळे निलेश राणे नाराज असल्याची चर्चा होती. दरम्यान त्यांच्या या ट्विटनंतर भाजप नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला होता. निलेश राणे यांच्या आजच्या बॅनरवरून तरी भाजपला त्यांची मनधरणी करण्यात यश आलेल दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार विमान अपघात प्रकरणी सर्वात मोठी कारवाई,DGCA ची व्हीएसआरच्या विमान उड्डाणावर बंदी

Wednesday Horoscope : मनासारखा दिवस जाईल, डोके शांत ठेवून काम कराल; ५ राशींच्या लोकांचं नशीब पालटणार

Digital Arrest: फोन आला, कोणी व्हिडिओ कॉल केला तर काय कराल? मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला बचावाचा मार्ग

T20 World Cup : झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्याआधी मोठी अपडेट, मॅच विनर फलंदाजानं अचानक टीम इंडियाची साथ सोडली, कारण चिंताजनक

Maharashtra Live News Update: विक्रोळीतील महालक्ष्मी डेरीतील ‘माझा’ शीतपेयात आढळला कचरा

SCROLL FOR NEXT