अमर घटारे, साम टीव्ही अमरावती
अमरावतीत महायुतीचा अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलाय. शिंदे गटाचे नेते अभिजीत अडसूळ आक्रमक झाले आहेत. राणा दांपत्यावर घणाघात करत त्यांनी रवी राणा यांना महायुतीमधून काढा, अन्यथा आम्ही शिवसेना म्हणून बाहेर निघू, असा इशारा दिलाय. काही दिवसांपूर्वी रवी राणा यांनी आनंदराव अडसूळ हे अमित शहा यांना ब्लॅकमेलिंग करत असल्याचा आरोप केला होता. मात्र, याला प्रतिउत्तर देत अभिजीत अडसूळ यांनी आमच्याकडे तशा प्रकारचं पत्र असल्याचं म्हटलंय.
राणांना महायुतीमधून बाहेर काढा
रवी राणा यांचं वक्तव्य अतिशय बालिशपनाचं आणि असंसदीय वक्तव्य आहे. सगळ्या पक्षाचे नेते त्यांच्या विरोधामध्ये असतात. हे असे नेते शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यावर अशी अर्वाच्य भाषा वापरत असतील, स्वतःला महायुतीचे नेते समजत असतील तर महायुतीमधून त्यांना बाहेर फेकलं गेलं पाहिजे. असे लोक जर महायुतीमध्ये राहत असतील तर आम्ही शिवसेना म्हणून बाहेर निघू, असं वक्तव्य आज अडसूळ यांनी (Mahayuti Crisis) केलंय.
अभिजीत अडसूळ काय म्हणाले?
अमरावती मतदारसंघावर आमचा दावा होता. परंतु अमरावती लोकसभेची जागा आनंदराव अडसूळ यांनी लढू नये, त्या बदल्यामध्ये आम्ही तुम्हाला राज्यपाल पद देत आहे. असं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे (Maharashtra Politics) दिलं होतं. त्यानंतर अमित शहा यांच्या विनंतीला आनंदराव अडसूळ यांनी मान दिला, ते लोकसभेची निवडणूक लढले नाहीत. आनंदराव अडसूळ जर निवडून आले असते, तर अमरावती (Amravati) जिल्ह्याला एक कॅबिनेट मंत्रीपद मिळालं असतं. मात्र हा जिल्ह्याचा आणि शिवसेनेचा लॉस झालाय, असं देखील अभिजीत अडसूळ म्हणाले आहेत.
अमरावतीत वातावरण तापलं
नवनीत राणा जात पडताळणी प्रकरणी बोलताना अभिजीत अडसूळ म्हणाले की, आम्हाला हा सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल मान्य नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिल्याप्रमाणे जर सुप्रीम कोर्टात न्याय मिळाला (Abhjit Adsul Criticized Navneet Rana Ravi Rana) नाही, तर मी क्रिव्हेटी पिटीशन टाकू शकतो, असा देखील इशारा अडसूळ यांनी दिलाय. नवनीत राणा फॉर्म भरण्याआधीच सुप्रीम कोर्ट अचानक येथे त्यांच्या बाजूने निकाल देत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसेच प्रवीण दरेकर म्हणजे भारतीय जनता पार्टी नाही, अशी टीका देखील त्यांनी केलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.