Beed Assembly Constituency Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: ज्योती मेटेंच्या पक्ष प्रवेशामुळे बीडमधील राजकीय समीकरण बदललं, संदीप क्षीरसागर यांचा पत्ता कट होणार?

Beed Assembly Constituency: ज्योती मेटे यांच्या पक्ष प्रवेशामुळे आता बीड विधानसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. या ठिकाणी विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांची उमेदवारी धोक्यात असल्याची चर्चा सुरू आहे.

Priya More

विनोद जिरे, बीड

शिवसंग्राम पक्षाचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. शिवसंग्रामच्या अध्यक्षा ज्योती मेटे यांनी प्रवेश केल्यामुळे बीडमधील राजकीय समीकरणं बदलली आहेत. ज्योती मेटे यांच्या राष्ट्रवादी शरद पवार गटातील प्रवेशामुळे आमदार संदीप क्षीरसागर यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा सुरू आहे. बीडमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक बैठक झाली. या बैठकीमध्ये ज्योती मेटे यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली.

ज्योती मेटे यांच्या पक्ष प्रवेशामुळे आता बीड विधानसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. या ठिकाणी विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांची उमेदवारी धोक्यात आली असून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट मराठा कार्ड खेळणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांची बैठक देखील झाली असून ज्योती मेटे यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. शिवसंग्रामकडून होत असलेल्या या मागणीमुळे आता बीड मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ज्योती मेटे यांनी सोमवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. यावेळी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. ज्योती मेटे यांच्या पक्षप्रवेशनंतर मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची ताकद वाढणार आहे. ज्योती मेटे या बीड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. शरद पवार यांनी त्यांना बीड मतदारसंघासाठी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने हा पक्ष प्रवेश केला असल्याचे ज्योती मेटे यांनी सांगितले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT