Sharad Pawar On Gautam Adani Saam Tv
महाराष्ट्र

Sharad Pawar Exclusive : अदानींवरून अजित पवारांचा गौप्यस्फोट, शरद पवारांनी एका झटक्यात विषय संपवला; पाहा VIDEO

Sharad Pawar On Gautam Adani: 'उद्योजकांच्या मर्जीने राजकारण होऊ शकत नाही.' असं वक्तव्य शरद पवार यांनी अदानींसोबतच्या भेटीवर केले आहे.

Priya More

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मोठ्या विधानाबाबतची बातमी समोर आली आहे. 'उद्योजकांच्या मर्जीने राजकारण होऊ शकत नाही.' असं वक्तव्य शरद पवार यांनी अदानींसोबतच्या भेटीवर केले आहे. शरद पवार यांनी साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे मोठं विधान केले आहे.

२०१९ चे नवीन सरकार बनवण्यामध्ये आणि त्याआधी सरकार पाडण्याच्या प्रयत्नांमध्ये तुम्ही अदांनींच्या घरी अमित शहांना भेटले होते. तिथे अजित पवार देखील उपस्थित होते. त्यात तुमची चर्चा होऊन हे सरकार कसे भाजपसोबत स्थापन होईल अशाप्रकारचा तुम्ही निर्णय घेतला होता. अशा स्वरूपाचा उघडपणे आरोप अजित पवारांनी केला. या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवारांनी सांगितले की, 'असं झालंय का? सरकार स्थापन झालं नाही तर चर्चा कशाला करायची. असं काय केलं असतं ते लोकं सांगतात. एकही दिवस सत्ता नाही मग अशा प्रश्नांना अर्थ नाही. ही गोष्ट खरी आहे की, मी अनेक वेळा अजित पवारांना घेऊन अनेकांची बैठक घेतली. देशाचे गृहमंत्री यांना मी एकदा काय तीन-चार वेळा भेटलो असेल.'

भाजपबरोबर अदानी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत होते असे चित्र तयार केले जात आहे या प्रश्नाचे उत्तर देताना शरद पवारांनी सांगितले की, 'राजकारणाचा विषय विशेष करून उगीच हे राजकीय निर्णयात सहभागी असतात यात काय तथ्य नाही. हे कुणी मान्य करत नाही. 'वर्षा'चा कार्यक्रम काय हे सांगायाला तो आला तर आम्ही सांगू तुझी जागा इथं नाही. बाहेर जा. असे मी सांगेल.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT