Sharad Pawar Vs Ajit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra NCP Crisis: अजित पवार गटावर कायदेशीर कारवाई करा.. निवडणूक आयोगासमोर मोठी मागणी; आजच्या सुनावणीत काय घडलं?

Sharad Pawar Vs Ajit Pawar: दोन्ही गटाकडून पक्ष आणि चिन्हावर दावा केला जात असून सध्या निवडणुक आयोगासमोर यावर सुनावणी सुरू आहे.

Gangappa Pujari

प्रमोद जगताप, प्रतिनिधी

NCP Party And Symbol Hearing:

राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाचा वाद आता निवडणुक आयोगाच्या कोर्टात गेला आहे. दोन्ही गटाकडून पक्ष आणि चिन्हावर दावा केला जात असून सध्या निवडणुक आयोगासमोर यावर सुनावणी सुरू आहे. आजच्या सुनावणीत शरद पवार गटाच्या वकिलांनी युक्तीवाद करताना अजित पवार गटावर पुन्हा एकदा निशाणा साधला असून खोटी शपथपत्रे सादर केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मोठी मागणी केली आहे. या प्रकरणी शुक्रवारी पुढील सुनावणी होणार आहे.

मागच्या सुनावणीवेळी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटाकडून युक्तिवादावेळी अजित पवार गटावर बोगस प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा आरोप करण्यात आला होता. हाच मुद्दा पकडत शरद पवार गटाचे वकिल अभिषेक मनू सिंघवी यांनी पुन्हा अजित पवार गटाविरोधात जोरदार युक्तीवाद केला.

खोटी शपथपत्रे सादर केल्याप्रकरणी अजित पवार गटावर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. कुवर प्रताप सिंग हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. आणि ते शरद पवार गटासोबत आहेत. परंतु अजित पवार (Ajit Pawar) गटाने त्यांचे खोटं शपथपत्र आपल्या बाजूने सादर केल्याचेही शरद पवारांच्या वकिलांनी निदर्शनास आणून दिले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सिंघवी यांच्याकडून कायदेशीर कारवाई संदर्भातले काही दाखले देखील आयोगासमोर मांडण्यात आले. अजित पवार गटाच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगा ला संभ्रमात ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला. विशेष म्हणजे अजित पवार गटाकडून शपथपत्रे सादर केलेली कुवर सिंग हे स्वतः या सुनावणीला शरद पवार यांच्यासोबत हजर होते.

दरम्यान, आजच्या सुनावणीला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः उपस्थित होते. त्यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. तसेच अजित पवार गटाकडून रुपालीताई चाकणकर, सुनील तटकरे, अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारही (Parth Pawar) उपस्थित होते. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT