ncp crisis Saam TV
महाराष्ट्र

NCP Crisis: 'पक्ष विस्तारात अजित पवारांची भूमिका नाही...' शरद पवार गटाचा जोरदार युक्तीवाद; आजच्या सुनावणीत काय घडलं?

Sharad Pawar Vs Ajit Pawar: राष्ट्रवादीमधील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असून पक्ष आणि चिन्हासाठी जोरदार लढाई सुरू आहे. यासंबंधीची सुनावणी सध्या निवडणूक आयोगासमोर सुरू आहे.

Gangappa Pujari

प्रमोद जगताप, दिल्ली, २४ नोव्हेंबर २०२३

NCP Party and Symbol Hearing:

राष्ट्रवादीमधील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असून पक्ष आणि चिन्हासाठी जोरदार लढाई सुरू आहे. शरद पवार आणि अजित पवार गटाकडून पक्षावर दावा केला जात असून यासंबंधीची सुनावणी सध्या निवडणूक आयोगासमोर सुरू आहे. आजच्या सुनावणीत शरद पवार गटाकडून देवदत्त कामत यांनी महत्वाचा युक्तीवाद करताना अजित पवार गटावर अनेक गंभीर आरोप केले. ज्यामध्ये त्यांनी पक्ष ताब्यात घेण्यासाठी हा संपूर्ण कट रचल्याचा सर्वात मोठा आणि गंभीर आरोप केला.

आजच्या सुनावणीत काय काय झालं?

आतापर्यंत शरद पवार हेच कायम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांनीच पक्षाचा विस्तार केला ते निर्विवाद अध्यक्ष राहिले आहेत त्यामुळं त्यांच्या अध्यक्षपदावर प्रश्न उपस्थित केला जाऊ शकत नाही.." असे शरद पवार गटाचे वकिल देवदत्त कामत म्हणाले. तसेच राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवार यांची निवड आमदार करूच कसे शकतात? हा मला पडलेला प्रश्न आहे असेही ते म्हणाले.

पक्षावर ताबा मिळवण्याचा कट...

तसेच  पक्षाच्या संघटनेचा किंवा अध्यक्षपदाचा वाद नसून एका गटाला पक्षावर ताबा हवा आहे, त्यासाठी हा कट रचला गेला असल्याचा गंभीर आणि महत्वाचा मुद्दा शरद पवार गटाने उपस्थित केला. अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व सत्ता हवी आहे. म्हणुन त्यांनी प्रफुल पटेल यांच्याशी संपर्क साधला. असा गंभीर आरोपही निवडणूक आयोगासमोर केला गेला.

पक्षाच्या विस्तारामध्ये अजित पवारांची भूमिका नाही..

शरद पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांच्यामुळेच पक्षाची प्रगती झाली असून अजित पवार (Ajit Pawar) यांचा पक्ष विस्तारामध्ये कुठलाही हातभार नाही किंवा भूमिका देखील राहिली नाही.. असे देवदत्त कामत यावेळी म्हणाले. तसेच लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये आमच्याकडेच बहुमत आहे, असा दावाही शरद पवार गटाकडून करण्यात आला.

अचानक भाजपमध्ये जाण्याचा निर्णय...

दिल्लीतील (Delhi) राष्ट्रीय अधिवेशनामध्ये शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्याचे पत्र देशभरातील राष्ट्रवादीच्या सर्व कार्यालयांना आणि पदाधिकाऱ्यांना प्रफुल पटेल यांनी पाठवले होते. प्रफुल पटेल यांनी पाठवलेल्या पत्रावर सर्व कार्यालयांनी आनंदाने निर्णय स्विकारल्याचे कळवले. कोणीही विरोध केला नाही. मात्र ३० जून रोजी अजित पवार यांच्या नेतृत्वातील एका गटाने भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा अचानक निर्णय घेतला.. असे शरद पवार गटाचे वकील म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: साखरपुड्यात रक्तरंजित थरार! फोटो काढायला नकार दिल्याने तरुणाची सटकली, वेटरवर धाडधाड गोळ्या झाडल्या

Healthy Breakfast Without Eggs: हेल्दी नाश्त्यात फक्त अंडीच कशाला? या ४ घरगुती पदार्थातून मिळेल भरपूर प्रोटीन, एकदा ट्राय कराच!

Maharashtra Live News Update: चिखला गावात परिस्थिती शांत; नागरिकांचे प्रशासनाला सहकार्य, शांततेचे आवाहन

छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून वाद; तब्बल 46 जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

अजब गजब! विहिर चोरीला गेली, शेतकरी आला रडकुंडीला; महाराष्ट्रात कुठे घडला धक्कादायक प्रकार?

SCROLL FOR NEXT