Political storm brews as Sanjay Raut hints at possible NCP merger with BJP. saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: २५-३० आमदारांसह राष्ट्रवादी भाजपमध्ये विलीन होणार; राऊतांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेस २५-३० आमदारांसह भाजपमध्ये विलीन होईल,असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. यामुळे महाराष्ट्रात मोठ्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Bharat Jadhav

  • Sanjay Raut यांचा मोठा दावा

  • २५-३० आमदारांसह राष्ट्रवादी भाजपमध्ये विलीन होण्याची शक्यता

  • Sunetra Pawar यांचा दिल्ली दौरा चर्चेत

उपमु्ख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या लेटर बॉम्बनं राजकीय वर्तुळात खळबळ उडवल्यानंतर आता राजकीय भूंकप होणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. सुनेत्रा पवार या बुधवार रात्री अचानक दिल्ली दौऱ्यावर गेल्या आहेत. तेथे त्या एनडीएच्या नेत्यांना भेटणार आहेत, शिवाय त्या कॉग्रेसच्या नेत्यांना भेटणार आहेत.

त्याच दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे राज्यातील राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा आणि दुसरीकडे राऊतांचे विधान यामुळे खळबळ उडाली आहे.

एका-दोन दिवसापूर्वीच सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत भाष्य केलं होतं. आता संजय राऊत यांनीही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणात बाबत विधान केलंय. मात्र राष्ट्रवादीचं विलिनीकरण हे भाजपमध्ये होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. भविष्यात २५ ते ३० आमदारांसह राष्ट्रवादी पक्ष भाजपमध्ये विलीन होईल. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला भाजरमध्ये विलीन व्हावेच लागेल, असं संजय राऊत यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले.

तटकरे आणि पटेल यांना पक्षात पद नसल्याची चर्चा सुरू आहे, त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे अजित पवार यांचे सहकारी आहेत, ते आता सुनेत्रा पवारांचे सहकारी नाहीत असं, संजय राऊत म्हणालेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेत बदलावरून वातावरण तापले आहे. कार्याध्यक्षाला अध्यक्षासारखे अधिकार बहाल करण्याचा मुद्दा वादाचे कारण ठरत आहे. यावरून पक्षातील वरिष्ठांमध्ये नाराजी असल्याची माहिती समोर येत आहे.

पक्षच हायजॅक करण्याचा काहींचा प्रयत्न असल्याचा आरोप सातत्याने करण्यात येतोय. दरम्यान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या अडचणी वाढण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान पक्षाच्या घटना बदलाबाबत पटेल आणि तटकरेंनी सुनेत्रा पवार यांच्याकडे स्पष्टीकरण दिले आहे. परंतु या दोन्ही नेत्यांच्या स्पष्टीकरणावरती सुनेत्रा पवार असमाधानी आहेत.

पक्षाच्या घटनेत बदल करून अध्यक्षांसोबत कार्याध्यक्षांकडे अधिकार द्यावेत,असे पत्र पटेल आणि तटकरे यांनी निवडणूक आयोगाला दिले होते. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी असा पत्र व्यवहार झाला होता. अजितदादांचा विमान अपघात २८ जानेवारी रोजी झाला होता. त्यानंतर हा पत्रव्यवहार करण्यात आला. या पत्रानंतर सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला हे सर्व पत्र व्यवहार अमान्य समजावेत, असं पत्राद्वारे कळवलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : आखाती युद्धाचा परिणाम, मनमाड शहरात एकमेव असलेला गोगॅस पंप झाला ड्राय

Kidney failure symptoms: पाठदुखी हे पहिलं लक्षण नाही; किडनी फेल होण्याच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष नको

Sonali Bendre: अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि तिचा नवरा अडचणीत; मावळच्या शेतकऱ्याने खेचलं कोर्टात, नेमकं प्रकरण काय?

Gold Rate Today: खुशखबर! सोनं झालं स्वस्त; १० तोळ्यामागे १५,३०० रुपयांची घसरण; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Kapil Sharma: २० वर्षांच्या कारियरमध्ये केले फक्त ४ चित्रपट, एक हिट तीन फ्लॉप, तरीही आहे कोट्यवधींचा मालक

SCROLL FOR NEXT