Jayant Patil News Jayant Patil News
महाराष्ट्र

Jayant Patil News: 'जो मंत्रालयात जाऊन बसतो तो जास्त पैसे कमावतो...' निधी वाटपावरुन जयंत पाटलांचे सरकारवर टीकास्त्र

Maharashtra Politics: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली असून निधी वाटपावरुन दुजाभाव होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

Gangappa Pujari

Jayant Patil News:

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास येत्या ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरुवात होणार आहे. सात डिसेंबरला सुरू होणारे हे अधिवेशन २० तारखेपर्यंत चालणार आहे. त्याआधी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली असून निधी वाटपावरुन दुजाभाव होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

काय म्हणाले जयंत पाटील?

"सात तारखेपासून राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला (Winter Session) सुरूवात होत आहे. त्याआधी सहा डिसेंबरला महाविकास आघाडीची बैठक घेऊ. राज्यासमोर अनेक गंभीर प्रश्न आहेत, ते सोडवले जातील अशी अपेक्षा आहे," असे जयंत पाटील यावेळी म्हणाले. तसेच निधीवाटपावरुन दुजाभाव केला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

"हाजीर तो वजीर अशी सध्याची सध्या परिस्थिती आहे. जो मंत्रालयात जातो ठाण मांडून बसतो तो जास्त पैसे मिळवतो. सत्ताधारी आमदारांमध्येच ही स्पर्धा असून समान निधीचं वाटप होत नाही. सरकारमधल्या पक्षांमध्येच असमानतेचं धोरण आहे. बाकी विरोधकांचं तर विचारायलाच नको..." असे जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले.

तसेच "जातनिहाय जनगणना झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. जातीजातींमधील तेढ कमी करण्यासाठी जनगणना आवश्यक आहे. मात्र सरकारला हा निर्णय घ्यायचा नाही. सरकार सकारात्मक असते तर त्यांनी याआधीच निर्णय घेतला असता.." असे जयंत पाटील यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)

  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Railway: रेल्वेचं RailOne अ‍ॅप लाँच! तिकीट बुकिंगपासून ते ट्रेन ट्रॅकिंग सर्वकाही एका क्लिकवर

Deepika Padukone: 'एवढ्या प्रेमाने भारताला प्रमोट केलं असतं...'; हिजाब परिधान केल्यामुळे दीपिका पदुकोण ट्रोल,नेमकं प्रकरण काय?

Mumbai Traffic : BKC मधील प्रवास महागणार! ५० मिनिटांत बाहेर न पडल्यास ‘कंजेशन फी’ आकारली जाणार

Mumbai: भारताच्या स्टार क्रिकेटपटूला अंडरवर्ल्डकडून धमकी, ५ कोटींच्या खंडणीची मागणी

Maharashtra Live News Update: महावितरणचे राज्यव्यापी संप सुरू

SCROLL FOR NEXT