नाशिक, ता. ३० मे २०२४
शालेय शिक्षणात मनुस्मृतीच्या श्लोकांचा समावेश होणार असल्याच्या चर्चांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आहेत. काल जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये चवदार तळ्यावर जाऊन मनुस्मृतीचे दहन केले. यावेळी त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो जाळल्याचा आरोप केला जात आहे. यावरुनच भाजपने आक्रमक भूमिका घेत आव्हाड यांच्याविरोधात राज्यभर निषेध मोर्चे, आंदोलने केली जात आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मात्र आव्हाड यांची पाठराखण केली आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ?
"जितेंद्र आव्हाड चांगल्या भावनेनं तिथं गेले. चुकून त्यांनी फोटो फाडले. त्यात काय आहे हे देखील त्यांनी पाहिलं नाही. त्यांनी नंतर माफी देखील मागितली. त्यामुळे त्यांची भावना लक्षात घेतली पाहिजे,आमचा विरोधक आहेत म्हणून टीका करण्यात अर्थ नाही," असे म्हणत छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण केली.
"मनुस्मृतीला सर्वांचाच विरोध आहे. त्यात महिलांच्या बाबतीत अतिशय घाणेरडं, अपमानास्पद लिखाण केले आहे. महिलांना अनेक अधिकार नाकारलेत. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली. शालेय अभ्यासक्रमात २ श्लोक आणले, चंचू प्रवेश का करायचा? तुमच्याकडे ज्ञानेश्वरांचे श्लोक नाहीत का?" असा सवालही छगन भुजबळ यांनी यावेळी उपस्थित केला.
दरम्यान, शालेय शिक्षणात मनुस्मृतीचा चंचू प्रवेश नको. बहुजन समाज, मनूस्मृतीला विरोध करणाऱ्या सर्वांनी हे लक्षात घ्यायला हवं.आम्ही शालेय शिक्षणात मनुस्मृतीचा चंचू प्रवेश होऊ देणार नाही, असे देवेंद्र फडणवीसही म्हणालेत, असेही छगन भुजबळ यावेळी म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.