Maharashtra NCP Crisis saam tv
महाराष्ट्र

NCP Crisis: अजित पवार गटाने मृत व्यक्तींची कागदपत्रे दिली, काल्पनिक वाद... शरद पवार गटाच्या वकिलांचे गंभीर आरोप

Sharad Pawar Vs Ajit Pawar: अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटाकडून पक्ष आमचाच असल्याचा दावा केला जात आहे.

Gangappa Pujari

Maharashtra NCP Crisis:

गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेला राष्ट्रवादी सत्ता संघर्षाचा वाद आता निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेला आहे. आजची सुनावणी संपली असून पुढची सुनावणी ९ तारखेला होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

सुनावणीनंतर शरद पवार गटाचे वकिल अभिषेक मनू सिंघवी यांनी विरोधी पक्षाकडून खोटी कागदपत्रे दाखवण्यात आली, तसेच आमची बाजू न ऐकताच निर्णय घेतल्याचा आरोप निवडणूक आयोगावर केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर आज सुनावणी पार पडली. यावेळी अजित पवार गटाकडून  शरद पवार  (Sharad Pawar) आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात, तसेच त्यांनी केलेल्या नियुक्त्याही बेकायदेशीर आहेत, असा युक्तीवाद केला. तसेच पक्षाचे सर्वात जास्त संख्याबळही आमच्याकडेच असल्याचे अजित पवार गटाने सांगितले.

आजच्या सुनावणीनंतर निवडणूक आयोगाने सोमवारी ९ तारखेला पुढील सुनावणी होणार असल्याचे सांगितले. सुनावणीनंतर शरद पवार गटाचे वकिल अभिषेक मनू सिंघवी (Abhishek Manu Singhvi) यांनी अजित पवार गटाच्या युक्तीवादावर गंभीर आरोप केले.

काय म्हणाले अभिषेक मनू सिंंघवी?

निवडणूक आयोगासमोर अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून चुकीचे आणि खोटे कागदपत्रे सादर केल्याचा गंभीर आरोप अभिषेक मनू सिंवी यांनी केला. तसेच मृत पावलेल्या व्यक्तींची कागदपत्रे आहेत, काही जण वेगळ्या पक्षाचे आहेत ते पक्षाचे आहेत, असे दाखवले असून काल्पनिक वाद आयोगासमोर मांडण्यात आल्याचे ते यावेळी म्हणाले.

तसेच दोन तास सुनावणी झाली. आम्ही दोन मुद्दे मांडले. आम्हाला न ऐकता पक्षात वाद आहे हे सिद्ध करु नका. दुसरा गटाचा युक्तिवाद संपले तेव्हा आम्हाला बाजू मांडण्याची संधी मिळेल. कोणीही खोट पुरावे घेऊन पक्षावर दावा करु शकत नाही, आम्ही प्राथमिक पुरावे दिले आहेत. सुनावणी वेळे आणखी पुरावे देऊ... असेही ते यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कथित महाराज किशोर जाधव शिवणीकर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

Maharashtra Politics: विनोद तावडेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर; ठाकरेंसोबतच्या भेटीमागचं नेमकं कारण काय?

मोठी बातमी! सरकारनं ५० हजारांसह हटवली आणखी एक अट; आता 'त्या' शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी

Saturday Horoscope: शनिदेवांच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार, कोणाला घ्यावी काळजी? वाचा उद्याचे संपूर्ण राशीभविष्य

Halwai Style Jalebi: सण किंवा खास प्रसंगी घरच्या घरी बनवा हलवाईसारखी केशर जिलेबी; नोट करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT