Ajit Pawar NCP 
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मोठी बातमी! अजित पवार बारामतीतून निवडणूक लढवणार नाहीत? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Ajit Pawar NCP: अजित पवार आज विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आहे, या मेळाव्यात ते मोठी घोषणा करू शकतात.अजित पवार विधानसभेसाठी बारामती सोडणार असल्याची चर्चा असतांना अजित पवार यांनी साम टीव्हीला याबाबत स्पष्टीकरण दिलंय.

Bharat Jadhav

राज्यातील राजकरणातील सर्वात मोठी बातमी समोर आलीय. विधानसभा निवडणुकीसंदर्भात अजित पवार हे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. अजित पवार यावेळी बारामतीमधून विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळवा होणार आहे. याच मेळाव्यात अजित पवार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. बारामती सोडणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर अजित पवार यांनी साम टीव्हीच्या प्रतिनिधीशी बोलतांना त्यांनी या चर्चांवर स्पष्टीकरण दिलंय.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांचे पुतणे योगेंद्र पवार हे बारामतीमधून विधानसभेची निवडणूक लढवतील, असा अंदाज आहे. त्यामुळे बारामतीत पुन्हा काका पुतण्यामध्ये सामना होण्याची शक्यता आहे. त्याचदरम्यान अजित पवार विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत भाजपसोबत हात मिळवणी केली आणि सत्तेत सामील झाले. महायुतीत समावेश झाल्यानंतर ते लोकसभा निवडणुकीत उतरले. त्यावेळी शरद पवार आणि अजित पवार अशी काका-पुतण्याची वर्चस्व वादाची लढाई पाहायला मिळाली होती. आता विधानसभेतही काका-पुतण्याची लढाई होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून युगेंद्र पवार राजकारणात सक्रीय झालेत. शरद पवार यांच्या अनेक कार्यक्रमात युगेंद्र पवार दिसले होते. लोकसभा निवडणुकीच्या त्यामुळे बारामती पुन्हा युगेंद्र पवार आणि अजित पवार यांच्यात सामना रंगणार, असल्याची चर्चा आहे. त्याचवेळी अजित पवार बारामती मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत अशी चर्चा अजित पवार यांच्या गटात होती. परंतु या चर्चांवर अजित पवार यांनी पडदा टाकलाय. 'मी बारामती सोडणार नाही असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6 : घरातल्यांनी केलं तन्वीला टार्गेट; थेट चोरीचा आरोप, बिग बॉसमध्ये मोठा राडा | VIDEO

Trending Mangalsutra Designs: सिंपल टू मॉडर्न, कोणते मंगळसूत्र तुमच्यासाठी सर्वात बेस्ट?

Surya Gochar: ६ फेब्रुवारीपासून पालटणार या राशींचं नशीब; 10 वर्षानी सूर्य करणार मंगळाच्या नक्षत्रात प्रवेश

Potato Dishes : संध्याकाळच्या नाश्तासाठी बटाट्यापासून बनवा झटपट '५' पदार्थ

Accident News : धुक्याने घात केला! प्रवाशांनी भरलेल्या बसचं नियंत्रण सुटलं अन् बस थेट दरीत कोसळली; ९ जणांचा मृत्यू, २६ जखमी

SCROLL FOR NEXT