Maharashtra Politics News: Saamtv
महाराष्ट्र

Sangli Politics: आबांच्या कुटुंबाकडून सहानुभूतीचं राजकारण, आता विजय आपलाच होणार; संजयकाका पाटील यांना विश्वास

Sanjaykaka Patil Criticized R R Patil Family: तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघांमध्ये संजयकाका पाटील अजित पवार गटाकडून तर रोहित पवार शरद पवार गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

Priya More

'सांगलीच्या तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघांमध्ये गेल्या ३५ वर्षांत केवळ भावनिक आणि सहानुभूतीच राजकारण करण्यात आलं.', अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांनी आर. आर. आबा कुटुंबावर केली आहे. सध्या तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमधील राजकारण चांगलेच तापले आहे. संजयकाका पाटील अजित पवार गटाकडून तर रोहित पवार शरद पवार गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सध्या या मतदारसंघात आरोप-प्रत्यारोपांचा खेळ रंगला आहे.

संजयकाका पाटील यांनी नुकताच आर. आर आबांच्या कुटुंबीयावर जोरदार टीका करण्यात आली. एमआयडीसीच्या नावाखाली लोकांच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार आबा कुटुंबांकडून झाल्याचा आल्याचा आरोप देखील संजयकाका पाटील यांनी केला आहे. तासगाव -कवठेमहांकाळ मतदारसंघामध्ये संजयकाका पाटील यांच्याकडून प्रचाराचा धडाका सुरू आहे. गावभेटी आणि वाडीवस्त्यांवर जाऊन संजयकाका पाटील आपला प्रचार करत आहे.

प्रचारादरम्यान संजयकाका पाटील हे महाविकास आघाडी आणि आर. आर आबांच्या कुटुंबीयांवर टीका करताना दिसत आहेत. संजयकाका पाटील यांनी यापूर्वी आर. आर आबा यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. आता ते आर आर पाटील यांचा मुलगा रोहित पाटीलविरोधात निवडणूक लढवत आहेत. यंदा वीस ते पंचवीस हजार मतांनी आपला विजय होईल, असा विश्वास संजयकाका पाटलांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, सांगलीच्या तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघातील संजयकाका पाटील विरुद्ध आर आर रोहित पाटील लढत ही अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. संजयकाका पाटील यांच्याकडून घर टू घर प्रचार करण्यात येत आहे. वाडी-वस्तीवर जाऊन संजय काका प्रचार करत आहेत. तर दुसरीककडे रोहिल पाटील यांच्याकडून देखील जोरदार प्रचार केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Exclusive : सिया-चेतनने ३१ मे पूर्वीच रचला डाव! केतन अग्रवाल हत्येच्या प्लॅनिंगची टाईमलाईन अखेर समोर, पाहा कट कसा शिजला?

Maharashtra News Live Update: दिल्लीत विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या मुद्द्यावरून अमित ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

Good News: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा; खात्यात कधी पैसे येणार?

सोनम वांगचुक यांची पहिली अट मान्य; हायकोर्टाचे थेट केंद्र सरकारला आदेश

Shubha Godbole: मेधा मांजरेकरांनंतर आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर; 'केमो कर्ल्स' पोस्टमधून व्यक्त केल्या भावना

SCROLL FOR NEXT