Nashik News:  Saamtv
महाराष्ट्र

Nashik News: शरद पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट... ५० दिवस तुरूंगात; नाशिकच्या तरुणाला मिळाले BJP सोशल मीडियाचे 'सहसंयोजक'पद

Maharashtra Politics: शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त ट्वीट केल्यानंतर निखिल भामरे विरोधात राज्यभरात ७ वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. यानंतर तो जवळपास महिनाभर तुरुंगात होता.

अभिजीत सोनावणे

Nashik Nikhil Bhamre News: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त ट्विट करणाऱ्या निखिल भामरे या तरुणाला भाजपकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. नाशिकच्या सटाणामधील निखिल भामरे याची भाजपच्या मीडिया सेलच्या सहसंयोजक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीने आश्चर्य व्यक्त केले जात असून नवा वाद रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष आणि जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणाला भाजप (BJP) सोशल मीडियाची जबाबदारी देण्यात आली आहे. नाशिकच्या (Nashik) सटाणामधील निखिल भामरेची भाजपच्या मीडिया सेलच्या सहसंयोजक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी या तरुणाने शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त लिखाण केले होते. वेळ आली आहे "बारामतीच्या गांधीसाठी, बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची. #बाराचाकाकामाफी माग.." अशा आशयाचे ट्वीट त्याने पोस्ट केले होते. ज्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली होती. या वादग्रस्त ट्वीटनंतर निखिल भामरेच्या (Nikhil Bhamre) विरोधात राज्यभरात ७ वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. यानंतर निखिल भामरे जवळपास महिनाभर तुरुंगात होता.

रोहित पवारांचा संताप..

या निवडीनंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. "सोशल मिडियात मा. पवार साहेबांविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या निखिल भामरे याची भाजपकडून सोशल मिडियाचा सहसंयोजक म्हणून नेमणूक केली जाते. म्हणजेच समाजात विकृतीला खतपाणी घालण्याचं काम भाजपच करत असल्याचं स्पष्ट झालंय. समाजात विष कालवणाऱ्या या विकृत कृतीचा तीव्र निषेध! असे ट्वीट त्यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nila Vikhe Patil : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! नीला विखे पाटील स्वीडनच्या संसदेत खासदार

Back Pain Exercises: गौरी-गणपतीच्या धावपळीमुळे कंबर दुखतेय? 'हे' ५ सोपे उपाय देतील झटपट आराम

Maharashtra News Live Update: केतन अग्रवाल खून प्रकरणी ५ हजार ५३ पानी दोषारोपपत्र दाखल

Mumbai Ganesh Visarjan : मुंबईत विसर्जनाला गालबोट, विजेचा धक्का लागून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Pune FDA : पुण्यात रात्रीच्या अंधारात महामार्गावर थरार! १ कोटींचा गुटख्याचा ट्रक पकडला; FDA ची सर्वात मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT