Maharashtra Politics Saamtv
महाराष्ट्र

Nanded News: अशोक चव्हाणांचा काँग्रेसला 'दे धक्का'; ५५ माजी नगरसेवकांनी रामराम करत भाजपमध्ये केला प्रवेश

Maharashtra Politics: भाजप प्रवेश आणि राज्यसभेवर निवड लागल्यानंतर काल अशोक चव्हाण पहिल्यांदाच नांदेडमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केल्याचे पाहायल मिळाले.

Gangappa Pujari

Ashok Chavan News:

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला धक्का देत काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. अशोक चव्हाण यांच्या जाण्याने काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. अशातच अशोक चव्हाण यांच्यानंतर नांदेडमधील तब्बल ५५ माजी नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे. भाजप प्रवेश आणि राज्यसभेवर निवड लागल्यानंतर काल अशोक चव्हाण पहिल्यांदाच नांदेडमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केल्याचे पाहायल मिळाले.

जेसीबीच्या साहाय्याने फुलांची उधळण करत मोठ्या दणक्यात स्वागत केल्याचे पाहून अशोक चव्हाणही भावूक झाले होते. आता नांदेडमध्ये एन्ट्री करतानाच अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. नांदेडमधील ५५ नगरसेवकांनी अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. स्वतः चव्हाण यांनी ट्वीट करत या पक्षप्रवेशाची माहिती दिली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या सुमारे ५५ हून अधिक माजी निर्वाचित नगरसेवक आणि स्वीकृत सदस्यांनी आज विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्यासाठी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे, असे अशोक चव्हाण यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ananya Pandey Photos: अनन्याचा 'बोल्ड' लूक, फोटोवर चाहते झाले फिदा

Maharashtra Live News Update: मदनपुरा येथे इमारतीचा भाग कोसळला; सात जण जखमी

Ear Infections: कानात सतत तेल टाकता का? होऊ शकतात 'हे' गंभीर आजार, जाणून घ्या

भररस्त्यावर अग्नीतांडव! ७० प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसला भीषण आग, दिवाळीसाठी गावाला निघाले पण....

सापांना आकर्षित करणारा वास कोणता? जाणून घ्या घरात शिरकावाचं खरं कारण

SCROLL FOR NEXT