Nana Patole Saam Tv
महाराष्ट्र

Nana Patole: कुणी कुणाला धमकावला तर घरात घुसून मारू, नाना पटोले यांचा रोख कुणाकडं?

Maharashtra Politics: भंडारा येथे आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात नाना पटोले यांनी खळबळजनक विधान केले. कुणी कुणाला धमकावला तर घरात घुसून मारू, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

Priya More

Summary -

  • नाना पटोलेंनी भंडाऱ्यात कार्यकर्त्या मेळाव्यात खळबळजनक विधान केले

  • त्यांनी कार्यकर्त्यांना शिस्तीचा इशारा दिला

  • कुणी कुणाला धमकावला तर घरात घुसून मारू, असं वादग्रस्त विधान त्यांनी केले

  • काँग्रेस पक्ष शिस्तप्रिय असल्याचं पटोले यांनी सांगितले

शुभम देशमुख, भंडारा

'पक्षात शिस्त असली पाहिजे. पक्षापेक्षा स्वतःला मोठं समजणाऱ्याला पक्षात स्थान नाही. कुणी कुणाला बोललं किंवा धमकावला तर त्याच्या घरात घुसून मारू.', असे खळबळजनक विधान करत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी भंडाऱ्यामध्ये कार्यकर्त्यांना सज्जड दम दिला. भंडाऱ्यामध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना त्यांनी हे विधान केले. याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

काँग्रेस कमिटीच्या वतीने भंडाऱ्यात कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नाना पटोले बोलत होते. यावेळी खासदार डॉ प्रशांत पडोळे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना इशारा देत सांगितले की, 'काँग्रेस पक्ष हा शिस्तप्रिय पक्ष असून पक्षापेक्षा मोठे समजणाऱ्या व्यक्तीला इथं स्थान नाही. जातीच्या आधारावर निवडणुका लढायला गेलो तर आपला सत्यानास होईल. कालपर्यंत जे झालं ते आता उद्या होता कामा नये. सर्वेमध्ये ज्या उमेदवाराचं नाव समोरील त्यांनाच काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी दिली जाणार. कुणी कुणाला बोललं किंवा धमकावला तर त्याच्या घरात घुसून मारू.'

तसंच, 'काँग्रेसमुक्त भारत करू अशा नरेंद्र मोदींच्या भाजपात काँग्रेसचे अनेक लोक गेलेत आणि आता काँग्रेसयुक्त भाजप झाली आहे. त्यामुळे अनेक आलेत अनेक गेलेत. मात्र काँग्रेस पक्ष संपू शकला नाही.', असं म्हणत नाना पटोलेंनी भंडाऱ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना आगामी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सज्जड दम दिला. नाना पटोले यांना आगामी निवडणुकीच्या तयारीला लागा असे देखील कार्यकर्त्यांना सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरी गणरायाचे उत्साहात आगमन; गणपतीसमोर साकारला कृषीचा खास देखावा

Skin Care: चेहऱ्याची काळजी घेताना नकळत करता 'या' चुका करू नका; हळू हूळ चेहरा पडेल काळा आणि डल

High Court : विद्यार्थ्यांना दिलासा! शाळा सोडल्यानंतरही दाखल्यातील चूक दुरुस्त होणार, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Ramayan Jai Jai Ram Song: गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर 'रामायण'ची खास भेट; रणबीर-साई पल्लवीचं 'जय जय राम' गाणं रिलीज

Fitness Test : तुम्ही खरंच फिट आहात का? फक्त ३० सेकंदांत कळंल, जिमचीही गरज नाही

SCROLL FOR NEXT