MVA tension rises: Congress declares solo fight in Mumbai as Thackeray brothers plan alliance. saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंवरून मविआत बिघाडी; मुंबईत कॉग्रेसचा स्वबळाचा नारा?

Alliance Sparks Trouble in MVA : ठाकरे बंधूंची युती जवळपास निश्चित झालेली असताना काँग्रेसनं स्वबळाचा नारा देत. महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आणलाय. मात्र मविआत वादाची ठिणगी नेमकी का पडली? महाविकास आघाडीतील पक्ष राज्यात एकत्र निवडणुक लढवणार की स्वबळावर? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Suprim Maskar

  • ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेमुळे महाविकास आघाडीत वाद सुरू झालाय.

  • काँग्रेसनं मुंबईत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.

  • निवडणुकीपूर्वी मविआतील अंतर्गत मतभेद समोर आलेत.

ऐकलंत, काँग्रेसच्या भाई जगतापांनी मुंबई महापालिकेसाठी स्वबळाचा नारा दिलाय. एकीकडे राज ठाकरेंना महाविकास आघाडीत सामावून घेण्याची चर्चा सुरु असताना दुसरीकडे भाई जगतापांनी थेट स्वबळाचा नारा दिलाय.ठाकरें बंधूंसोबत मुंबईत युती नकोच अशी भूमिका त्यांनी घेतलीय.

दुसरीकडे जगतापांच्या मुंबईतील स्वबळाच्या दाव्याचा ठाकरेसेना, मनसेच्या नेत्यांनी चांगलाच समाचार घेतलाय. तुमच्याकडे कुणी हात पसरलेत का? असा सवालच मनसेने केलाय.दरम्यान मविआतील अंतर्गत वाद उफाळून आल्यानंतर भाई जगतापांनीही आपल्या विधानावरून सारवासारव केलीय. ते माझं वैयक्तिक मत होत असं म्हणत पक्षश्रेष्ठीचं युती- आघाडीचा निर्णय घेतली, असं जगताप म्हणालेत.

दुसरीकडे वर्षा गायकवाडांनीही युतीचा निर्णय हायकमांड घेईल, असं विधान केलयं. तर विजय वडेट्टीवारांनी राज ठाकरेंकडून प्रस्ताव नाही. आम्हीच का बोलू असं म्हणत युतीच्या चर्चांना पूर्णविराम लगावलाय. मुळात ठाकरे बंधूंमधील जवळीक वाढल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनीही राज ठाकरेंसोबत युतीसाठी तयार नसल्याचे संकेत दिले होते... त्यातच आता भाई जगतापांनी ठाकरे बंधूंसोबतच्या युतीला नाकारल्यानं मविआतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय... त्यामुळे हा अंतर्गत वाद आता मविआतील वरिष्ठ नेते कशा रीतीने शमवतात यावर महापालिकेचं यशापयश अवलंबून असेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti: महायुतीचं ठरलं! मुंबईत एकत्र,राज्यात स्वतंत्र, विजयाची रणनिती काय?

Cough Syrup: कफ सिरपनं घेतला आणखी एकाचा जीव; दोन चमचे औषध प्यायल्यानंतर महिलेनं सोडला जीव, रुग्णालयातच घडला धक्कादायक प्रकार

Microwave: मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने होतात 'हे' परिणाम

Shocking : धक्कादायक! दारुच्या नशेत ५ जणांचा घरात घुसून महिलेवर सामूहिक अत्याचार

Dombivli News : डोंबिवलीत खांदेरी-उंदेरी किल्ल्यांची भव्य प्रतिकृती; स्वराज्य ग्रुपचा उपक्रम ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

SCROLL FOR NEXT