Santosh Dhuri joins BJP in the presence of Mumbai BJP president Amit Satam, sparking speculation over Sandeep Deshpande. saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: संतोष धुरींनंतर संदीप देशपांडेदेखील मनसेला 'जय महाराष्ट्र' करणार? स्वत: धुरींनी केला मोठा खुलासा

Sandeep Deshpande MNS Leader : मनसेचे तिकीट नाकारल्यानंतर संतोष धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.त्यानंतर संदीप देशपांडे मनसे सोडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. दरम्यान धुरी यांनी संदीप देशपांडे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर मोठा खुलासा केलाय.

Bharat Jadhav

  • संतोष धुरी यांनी मनसे सोडून भाजपमध्ये प्रवेश केला

  • तिकीट न मिळाल्याने धुरी नाराज असल्याची माहिती

  • धुरींच्या प्रवेशानंतर संदीप देशपांडे यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू

मनसेकडून तिकीट न मिळाल्यानं नाराज असलेले संतोष धुरींनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये धुरी यांनी कमळ हाती घेतलं. धुरी यांच्या भाजप प्रवेशानंतर संदीप देशपांडे सुद्धा भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. संदीप देशपांडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडणार असल्याची चर्चा सुरू असताना देशपांडे राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेलेत. दरम्यान देशपांडेच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर संतोष धुरी यांनी मोठा खुलासा केलाय.

दरम्यान भाजपमध्ये प्रवेश करताना संतोष धुरी यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. आमचा पक्ष साहेबांनी त्यांना सरेंडर केला. आम्हाला ज्या सीट दिल्यात, दिसायला आकडा ५२ आहे. पण त्यातील ७ते ८ जागा येतील की नाही ही शंका आहे. ज्या सीट हव्या होत्या त्या दिल्या नाहीत. आता ज्या सीट दिल्या आहेत, तिकडे त्यांच्याकडे उमेदवार नव्हते, नगरसेवक होते, पण त्यांची नावे खराब होती, अशा सीटही त्यांनी आम्हाला दिल्या” असं संतोष धुरी म्हणालेत.

मनसे आणि उद्धव ठाकरे शिवसेना युतीची बोलणी सुरू असताना ते प्रत्येक विधानसभेत दोन जागा सोडणार असं ठरलं. पण प्रत्यक्षात एक जागा मिळाली, संतोष धुरी म्हणाले. मनसेच्या स्थापनेपासून आम्ही राज ठाकरेंसोबत होतो. मनसे आणि ठाकरे गटात झालेल्या चर्चांमध्ये संदीप देशपांडे यांना डावलण्यात आल्यानंही संतोष धुरी नाराज आहेत. आमचे नेते संदीप देशपांडे यांना कुठल्याही प्रकारच्या चर्चेत घेतलं नाही.

आपण आणि संदीप देशपांडेही कुठीही दिसले नाहीत, कारण मातोश्रीवरून तसाच आदेश होता. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे चर्चेत नसावेत असा आदेश देण्यात आला होता. त्यानंतर आपण संदीप देशपांडे यांना मनसे सोडण्याविषयी सांगितलं. त्यावेळी त्यांनी आपल्याला तुझा विचार कर असं सांगितलं.

संतोष धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर देशपांडे देखील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. त्याबाबत बोलताना धुरी म्हणाले, मी माझा निर्यण सांगितल्यानंतर देशपांडेंनाही विचारलं. त्यावेळी त्यांनी तू तुझा विचार कर, मी काही येत नाही, असं देशपांडे म्हणाल्याचं संतोष धुरींनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Child growth: मुलाची उंची आणि वजन योग्य आहे का? या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास वाढीवर होऊ शकतो परिणाम

Thackeray Vs Shinde : ठाकरेंना शिंदेंचा झटका; आता 'सोशल' स्ट्राइक, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी शिंदेसेनेत

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT