Chandrakant Patil On Sanjay Kaka Patil Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: भाजपला नको 'काका'; संजयकाका पाटलांसाठी भाजपचे दरवाजे बंद

Chandrakant Patil On Sanjay Kaka Patil: संजय काकांना आमची ऑफर नाहीये. ते आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत काम करतात. त्यांचे तिकडेच पुनर्वसन केले पाहिजं, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी पक्ष प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय.

Bharat Jadhav

गेल्या काही दिवसांपासून सांगलीच्या राजकारणात मोठा फेरबदल होणार असल्याची चर्चा होती. राष्ट्रवादी काँग्रेसमधील माजी खासदार संजय काका पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची तुफान चर्चा होती. पण आता संजयकाका पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळालाय. हा पूर्णविराम दुसरं तिसरं कोणी नाही तर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनीच दिलाय. सांगलीत माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना चंद्रकांत पाटील यांनी संजय पाटील यांच्या पक्षप्रवेशांच्या चर्चांवर आज पडदा टाकला.

संजयकाका पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत, त्यांचे तिथेच पुनर्वसन केलं पाहिजे. संजयकाका पाटील हे आमचे जुने नेते व मित्र असल्यामुळे त्यांचा राष्ट्रवादी अजित पवार पक्षात पुनर्वसन व्हावे,यासाठी आम्ही अजित पवारांना मदत करू,अशी भूमिका मंत्री चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केली. पण संजय काका पाटील भाजपमध्ये येतील या चर्चांना तथ्य नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

काही दिवसांपासून संजय काका पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची चर्चा होती. आज मात्र या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळालाय. त्याचबरोबर सांगलीचे विद्यमान अपक्ष खासदार विशाल पाटील यांना भाजपसोबत येण्याची ऑफर आपण देतच राहू,असं देखील चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलंय. विद्यमान खासदार विशाल पाटील तरूण तडफदार आहेत. ते संवेदनशील आहेत, त्यांना जनतेच्या प्रश्नांची जाण आहे.

प्रश्न सोडविण्याकडे त्यांचा कल असतो. असा नेता भाजपमध्ये असला पाहिजे, यामुळे त्यांना भाजपात घेण्यासाठी आपण प्रयत्न करणारच, ्सं चंद्रकांत पाटील म्हणाले. ते अपक्ष खासदार असल्याने ते भाजपमध्ये थेटपणे प्रवेश करू शकणार नाहीत. त्यांना भाजपचे सहयोगी म्हणून यावे लागेल. परंतु त्यांनी भाजपमध्ये यावे, ही माझी प्रामाणिक भावना आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

सांगली लोकसभेच्या तिरंगी लढतीत अपक्ष म्हणून विशाल पाटील निवडून आले. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील असतानाही काँग्रेस पक्षाने पडद्यामागून विशाल पाटील यांचे काम करून त्यांना निवडून आणलं. त्याच विशाल पाटील यांना मंत्रिपदाचे वेध लागलेत. त्यासाठी त्यांनी पक्षबदलाची तयारी देखील दर्शवलीय. त्यामुळे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेण्यास इच्छुकआहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Russia- Ukraine War: रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; टार्गेटवर कीवमधील मंत्री, कॅबिनेट इमारतीतून उठले धुरांचे लोट

Lalbaugcha Raja Viral Video : लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी सुरक्षारक्षकांचा मुजोरीपणा, बाप लेकीला ढकलले आणि...

Maharashtra Live News Update: पुण्यात गणपती विसर्जनाला रेकॉर्ड, ३१ तासांपासून मिरवणूक सुरूच

Online Food Delivery : ऐन सणासुदीच्या हंगामात महागाईची फोडणी; ऑनलाइन जेवण ऑर्डर करणे महागणार?

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : भरतीच्या अडथळ्यामुळे लालबागच्या राजाच्या विसर्जनाला विलंब|VIDEO

SCROLL FOR NEXT