Maharashtra Politics Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Politics : मराठवाड्यात भाजपला खिंडार; बडा नेता लागला शरद पवार गटाच्या गळाला?

Former MLA Sudhakar Bhalerao : भाजपचे मराठवाड्यातील उदगीरचे माजी आमदार माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

Sandeep Gawade

मराठवाड्यात भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भालेराव लवकरच करणार शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. भालेरावांच्या रूपाने राष्ट्रवादीला उदगीरमध्ये मोठा चेहरा मिळाला आहे. भालेराव हे येत्या निवडणुकीत विद्यमान मंत्री संजय बनसोडे यांच्या विरोधात उमेदवार असण्याची शक्यता आहे.

भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित मानला जात आहे. भालेराव हे उदगीर राखीव मतदार संघातून सलग दोन वेळा निवडून आले आहेत. २०१९ मध्ये भाजपने त्यांना डावलून परभणीतील डॉक्टर अनिल कांबळे यांना उमेदवारी दिली. मात्र त्यावेळी राष्ट्रवादीचे संजय बनसोडे विजयी झाले. संजय बनसोडे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला असून महायुती सरकारमध्ये ते सध्या क्रीडामंत्री आहेत.

विधानसभेत संजय बनसोडे अजित पवार गटाकडून उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपला अजित पवार गटाला मतद करावी लागणार आहे. त्यामुळे सुधाकर भालेराव यांना संधी मिळण्याची शक्यता कमी. त्यामुळे भालेराव यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. उदगीर हा एकेकाळचा भाजपचा बालेकिल्ला होता. मात्र, आता राष्ट्रवादीच्या दोन गटातच विधानसभा निवडणुकीत सामना होण्याची शक्यता आहे.

एकेकाळी मराठवाड्यात भाजपची गोपीनाथ मुंडे खासदार आणि पंकजा मुंडे व सुधाकर भालेराव हे दोघे आमदार अशी स्थिती होती. मात्र पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे सुधाकर भालेराव कुरघोड्यांमुळे हैराण होते. त्यामुळे सुधाकार भालेराव गेल्या काही महिन्यांपासून भाजप सोडणार अशा चर्चा होत्या. त्यातच त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचीही चर्चा सुरू होती, आता त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar Crime: दुहेरी हत्याकांडातील आरोपीची शाही मिरवणूक! हत्या केलेल्यांच्या घरासमोर फटाक्यांची आतषबाजी, नगरमधील घटना

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

Post Office Scheme : फक्त व्याजातून २ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची ही योजना नक्की आहे तरी काय?

Maharashtra Assembly Election : खासदार वडिलांपेक्षा मुलाची संपत्ती तिप्पट, विलास भुमरेंकडे ३३ कोटींपेक्षा जास्त संपत्ती!

SCROLL FOR NEXT