Manikrao Kokate  Saam Tv
महाराष्ट्र

Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंचा 'तो' व्हिडीओ कुणी काढला? समोर आली मोठी अपडेट

Manikrao Kokate Rummy Video: माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून राजकारण चांगलेच तापले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. हा व्हिडीओ कुणी काढला याचा तपास सध्या सुरू आहे.

Priya More

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहामध्ये रमी गेम खेळतानाचा एक व्हिडीओ समोर आला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. आता हा व्हिडीओ नेमका कुणी काढला? याचा तपास केला जात आहे. प्रेक्षक गॅलरीतून हा व्हिडीओ कुणीतरी काढला असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत विधिमंडळाकडून चौकशी केली जात असून सभापतींना लवकरच अहवालाचे सादरीकरण केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रमी गेम खेळतानाचा जो व्हिडीओ व्हायरल झाला होता त्याची चौकशी विधिमंडळ सचिवालयाने सुरू केली आहे. माणिकराव कोकाटे यांचा व्हिडीओ प्रेक्षक गॅलरीतून काढला गेला होता. हा व्हिडीओ कुणी काढला होता याची माहिती समोर आली नव्हती पण आता व्हिडीओ काढणाऱ्याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणाची विधिमंडळाकडून चौकशी सुरू आहे. माणिकराव कोकाटे यांचा हा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

माणिकराव कोकाटे यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण देखील दिले होते. 'मला रमी खेळता येत नाही. मी मोबाईल उघडताच गेमचा पॉपअप आला होता. मी स्कीप करेपर्यंत त्याचा व्हिडीओ काढण्यात आला होता.', अशी माहिती त्यांनी दिली होती. यावेळी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यावर बोलताना देखील माणिकराव कोकाटे यांनी थेट सरकारवरच वादग्रस्त विधान केले होते. 'शेतकरी भिकारी नाही तर सरकार भिकारी आहे.', असे माणिकराव कोकाटे बोलले होते. त्यांच्या या विधानावरून देखील वाद निर्माण झाला.

माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडीओ आणि सरकारला भिकारी असल्याच्या म्हणण्यावरून आता विरोधक त्यांच्या राजीनामाच्या मागणी करत आहेत. त्यांच्या या वक्तव्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात प्रतिकिया देताना सभापती राम शिंदे यांनी सांगितले की, 'सभागृहातील कुणी हे मोबाईलवर चित्रीकरण केल्याचे आढळले नाही. यामुळे प्रेक्षक गॅलरीतून कुणी तरी हे चित्रीकरण केले का? याची तपासणी होईल. त्यानंतर सभापती राम शिंदे यांना अहवाल सादर केला जाईल.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT