LOK SABHA SPEAKER APPROVES MERGER OF 6 REBEL MPS, BIG BLOW TO UDDHAV THACKERAY CAMP saam tv
महाराष्ट्र

Politics : उद्धव ठाकरेंना जोरदार झटका! ६ बंडखोर खासदारांच्या शिंदेसेनेतील विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी

Thackeray Group Rebel MP : ठाकरे गटातून बाहेर पडून शिंदे गटात गेलेल्या सहा बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांनी मंजुरी दिली आहे. लोकसभा अध्यक्षांच्या मान्यतेनंतर लोकसभा सचिवालयाने यासंदर्भातील निर्णय जाहीर केला.

Bharat Jadhav

राज्यातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. राम मंदिरातील चोरीवरून उद्धव ठाकरे भाजपवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. देशभरात रामरक्षा आंदोलन करत आहेत, मात्र त्याचवेळी ठाकरेंना मोठा धक्का देणारी बातमी समोर आलीय. ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या सहा बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांनी मंजुरी दिली आहे. लोकसभा अध्यक्षांच्या मान्यतेनंतर लोकसभा सचिवालयाने यासंदर्भातील निर्णय जाहीर करण्यात आला. यामुळे उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या गटातील ६ खासदार गळाला लावून शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरनं राजकारणात खळबळ उडवून दिली होती. आता लोकसभा सचिवलयाकडून ठाकरे गटाच्या ६ फुटीर खासदाराच्या गटाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता शिंदे गटाचं ऑपरेशन टायगर हे यशस्वी झाल्याचं म्हटलं जातंय. यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय.

लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे एकूण ९ खासदार निवडून आले होते. त्यापैकी बरोबर दोन तृतीयांश खासदार म्हणजेच ६ खासदार शिंदेंनी फोडले होते. आधी या सगळ्या खासदारांना दिल्लीत नेण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी गट स्थापन केला, त्याला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता दिली. त्यानंतर या खासदारांच्या गटाने मुंबई एका जाहीर कार्यक्रमाद्वारे शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला.

मात्र या प्रवेशानंतर लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता बाकी होती. ही मान्यता आज लोकसभा सचिवलयाकडून देण्यात आलीय. दरम्यान ठाकरेंच्या ६ खासदारांचा वेगळा गट स्थापन करण्यावर ठाकरे गटाने यावर आक्षेप नोंदवला होता. त्यांनी या खासदारांना अपात्र ठरवण्यासाठी अर्ज केला होता. मात्र आज लोकसभा अध्यक्षांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात निर्णय दिलाय.

लोकसभा अध्यक्षांच्या मंजुरीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माध्याम प्रतिनिधींशी संवाद साधला. आम्ही तोडणारे नाहीत, जोडणारे आहोत. जे सहा खासदार आले आहेत. त्यांच्या मतदारसंघातील जनतेला न्याय देण्यासाठी, जनतेप्रती असलेली जबाबदारी पार पडण्यासाठी ते सोबत आले आहेत. निश्चितपणे त्यांच्या पाठिशी आम्ही उभे राहू. विकासनिधी मिळेल. लोकांची कामे केली म्हणून त्यांना पुन्हा एकदा लोकांसमोर जाण्याची संधी मिळेल.

पैसे घेऊन पक्षांतर केल्याच्या आरोपावर शिंदे काय म्हणाले?

२०-२५-३० लाख मतदारांमधून ते निवडून येतात. मतदारसंघात कामे केली पाहिजेत, ही त्यांची जबाबदारी असते. ६ खासदार जे आलेत, त्यांनी व्यक्तीगतरित्या स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेनेत प्रवेश केला नाही. जे लोक आरोप करतात, त्यांना पैशांशिवाय काही दिसत नाही. कारण त्यांच्याकडे लेना बँक आहे, देना बँक नाही. जे आमच्याकडे आलेत, त्यांना आम्ही विकासनिधी देऊ. गृहमंत्री अमित शहांसोबतही त्यांनी भेट घालून दिली आहे.

कोणीही गेला की पैसे घेऊन गेला असे आरोप होतात. हजारो, लाखो लोक का सोडून जाताहेत. आत्मचिंतन आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. कार्यकर्ता, खासदार, आमदार असो त्यांच्यासोबत ताकदीनिशी उभं राहण्याचे काम पक्षप्रमुखाने केले पाहिजे. पण त्यांना रामभरोसे सोडलं जात आहे. ते का सोडून जात आहेत, याचा विचार केला पाहिजे, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Life : रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल स्क्रोल करण्याची सवय आहे? शरीराचे काय होते जाणून हादरून जाल

Maharashtra News Live Update: शक्तिपीठाविरोधात13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सद्बुद्धी दिंडी

तुकाराम मुंढेंची धडक कारवाई! दूध वाढवण्यासाठी म्हशींना दिली जात होती बंदी असलेली इंजेक्शन्स

Jennifer Winget Marriage: घटस्फोटाच्या १२ वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेत्री अडकली विवाह बंधनात, नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल

Corn Appe Recipe : नाश्त्याला पोहा-उपमा खाऊन कंटाळा आला? ट्राय करा मऊशार मका आणि रव्याचे आप्पे; झटपट होईल तयार

SCROLL FOR NEXT