sharad pawar ajit pawar ncp Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शरद पवारांना अजित पवारांचा दे धक्का; ३ टर्म आमदार असलेला बडा नेता राष्ट्रवादीत जाणार

Rahul Mote Joins NCP Ajit Pawar Grop: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी अजित पवारांनी शरद पवारांना मोठा धक्का दिलाय. धाराशिवचे माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत.

Priya More

बालाजी सुरवसे, धाराशिव

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्यात अनेक बडे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे पक्षांतर सुरू आहे. महायुतीमधील पक्षांकडून महाविकास आघाडीतील पक्षांना एकापाठोपाठ एक धक्के दिले जात आहे. अशामध्ये पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. धाराशिवमधील शरद पवार गटाचे नेते आणि माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत. लवकरच ते घड्याळ हातामध्ये घालणार असल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिवमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मोठा दणका दिला आहे. परंड्याचे माजी आमदार राहुल मोटे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. शरद पवारांची साथ सोडत राहुल मोटे हे अजित पवारांचे घड्याळ हाती घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. लवकरच मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहुल मोटे यांचा पक्ष प्रवेश होण्याची शक्यता आहे.

परंडा मतदारसंघातून राहुल मोटेंनी ५ वेळा विधानसभेची निवडणूक लढवली होती. सलग तीन वेळा ते आमदार राहिले आहेत. मागील निवडणुकीत शिवसेनेच्या तानाजी सावंताकडून दीड हजारांच्या फरकाने राहुल मोटे यांचा पराभव झाला होता. राहुल मोटे यांच्या पक्ष प्रवेशामुळे धाराशिवमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बळ आणखी वाढणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असल्याचे सांगितले जात आहे.

कोण आहेत राहुल मोटे?

- परंडा मतदार संघाचे सलग ३ वेळा आमदार.

- आतापर्यंत ५ वेळा परंडा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली.

- राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती.

- २०२४ विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री तानाजी सावंत यांच्याविरोधात दीड हजार मतांनी पराभव झाला.

- भूम, परंडा, वाशी तालुक्यांमध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.

- मतदारसंघातील स्थानिक राजकारणात चांगली पकड आहे.

- उपमुख्यमंत्री अजित पवारांचे जवळचे नातेवाईक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bone Glue: हात-पाय मोडले तरी लगेच जुळतील? 2 मिनिटांत हाडं जोडणारा बोन ग्लू?

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

Solar Eclipse 2025: सूर्यग्रहणाच्या दिवशी दान करा 'या' गोष्टी, होतील अनेक लाभ

Mumbai Rain: स्वत:चा जीव धोक्यात घालून पाण्याला करून दिली वाट, बीएमसी कर्मचाऱ्याचा VIDEO व्हायरल

Avneet Kaur: जेन झी मुलींनी ग्लॅमरस लूकसाठी फॉलो करा अवनीत कौरच्या स्टायलिंग टिप्स

SCROLL FOR NEXT