Chhagan Bhujbal On Mahayuti leaders saam tv
महाराष्ट्र

Assembly Election : राष्ट्रवादी किती जागा लढणार? आधी अजितदादांनी ६० चा आकडा सांगितला, आता भुजबळांनी ९० जागांवर दावा केला!

Rohini Gudaghe

अजय सोनवणे, साम टीव्ही नाशिक

विधानसभेसाठी अजित पवार गटाच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झालीय. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार यांनी ६० चा आकडा सांगितला होता. तर आता छगन भुजबळ यांनी ८० ते ९० जागांवर दावा केलाय. छगन भुजबळ यांनी थेट आकडाच सांगितला आहे. शिवसेना शिंदे गट देखील महायुतीत १०० जागा मिळाव्यात, यासाठी आग्रही आहे. दोन्ही मित्र पक्षांची मागणी लक्षात घेता आता भाजपच्या वाट्याला किती जागा येतील, असा प्रश्न सर्वांना पडलाय.

छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?

अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ महायुतीच्या जागावाटपाबद्दल बोलताना म्हणाले की, आमचं पॉलिट ब्युरो (Assembly Election 2024) आहे. आमचे कारभारी अजित पवार, प्रफुल्ल पटेल ते सगळं पाहत आहेत. ते चर्चा करत असतात. कुठपर्यंत चर्चा आली त्यांना माहीत असेल? मी काही त्या चर्चेत जास्त लक्ष घालत (Mahayuti Seat Sharing Crisis) नाही. किती जागा मागितल्या हे त्यांनी मला सांगितले नाही पण ८० ते ९० जागा मागितल्या आहेत. त्याच्यावर किती निकाल येतो, याची कल्पना नसल्याचं छगन भुजबळ म्हणाले आहेत.

निवडणुकांमुळे विकास कामे रखडतात

महानगरपालिका निवडणूक आली की, आचारसंहितेमुळे विकास कामे थांबवा. पंचायत समिती निवडणूक आली की विकास कामे थांबवा. वेगवेगळ्या निवडणुका आल्या की, विकास कामे थांबवा हे खरं आहे. यातुनच 'वन नेशन वन इलेक्शन'चा विचार पुढे (Ajit Pawar) आला. विविध निवडणुकांमुळे विकास कामे ठप्प राहतात. फार पूर्वी ही संकल्पना शक्य होती. नंतर काही विधानसभा विसर्जित झाल्यामुळे मधेच निवडणुका घ्याव्या लागल्या. त्यामुळे हे टाईमटेबल विस्कळीत झालंय.

मोर्चेबांधणीला सुरुवात

वन नेशन वन इलेक्शन संकल्पनेला काही लोकांचा विरोध सुद्धा आहे. या विषयावर केंद्र सरकार काय तोडगा काढते, याची मला कल्पना नाही असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले आहेत. तसंच जुन्या पेन्शन योजनेवर मार्ग काढण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी २ ते ३ पर्याय शोधण्यात आले आहेत. जो पर्याय त्यांना मान्य असेल, तो स्वीकारण्याची मुभा त्यांना देण्यात आली असल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलंय. लोकसभा निवडणुकीत जागावाटपामध्ये झालेली दिरंगाई अन् त्यामुळे बसलेला फटका लक्षात घेऊन महायुतीने व्यूहरचनेला सुरुवात केल्याचं दिसतंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT