Mla Ravi Rana Saam Tv
महाराष्ट्र

Ravi Rana: मंत्रिपद न मिळाल्याने रवी राणांची जाहीर नाराजी, अधिवेशन असतानाही थेट अमरावती गाठले

Maharashtra Cabinet Expansion: नागपूरमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होत आहे. हिवाळी अधिवेशन असताना देखील रवी राणा मात्र अमरावतीमध्ये आहेत.

Priya More

महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवार पार पडला. यामध्ये ३३ कॅबिनेट आणि ६ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीमधील अनेक दिग्गज नेत्यांना डच्चू देण्यात आला. महायुतीमधील अनेक आमादारांना मंत्रिपदाची आशा होती. पण त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी पाहायला मिळत आहे. अशामध्ये अमरावती जिल्ह्याला देखील एकही मंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळे अमरावतीचे अपक्ष आमदार नवनीत राणा नाराज झाले आहेत.

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अमरावती जिल्ह्याला एकही मंत्रीपद मिळाले नाही. रवी राणा यांना मंत्रिपद मिळालं नसल्याने ते नागपूरवरून अमरावतीत दाखल झाले आहेत. आमदार रवी राणाना यांनी मंत्री पदासाठी भाजप पक्षश्रेष्ठींकडे जोरदार फिल्डिंग लावली होती. मात्र मंत्रिमंडळात वर्णी लागणार नसल्याने रवी राणा नाराज होत नागपूरवरून अमरावतीत दाखल झाले. तर दुसरीकडे मंत्रिपदाची संधी हुकल्यामुळे अर्जुन खोतकर हे देखील नाराज झाले असून अधिवेशन असताना सुद्धा ते जालन्याला गेले आहेत.

नागपूरमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होत आहे. हिवाळी अधिवेशन असताना देखील रवी राणा मात्र अमरावतीमध्ये आहेत. रवी राणा हे अधिवेशनाला उपस्थित राहणार नसल्यामुळे त्यांची नाराजी ही स्पष्टपणे दिसून येत आहे. आमदार रवी राणा यांना मंत्री मंडळात स्थान न देणे हे अमरावती जिल्ह्याचे दुर्भाग्य अशाप्रकारे ग्राफिक्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान, रवी राणा यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे त्यांच्या पत्नी माजी खासदार नवनीत राणा या देखील खूप नाराज झाल्या आहेत. नाराज झालेल्या नवनीत राणा यांनी “जिंदगी है, समंदर को क्या कम है वो बता भी नही सकता..” असा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यांच्या या व्हिडीओमध्ये चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये ३३ कॅबिनेट आणि ६ राज्यामंत्र्यांनी रविवारी शपथ घेतली. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळात ४२ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीमधील अनेक आमदारांचा पत्ता कट करण्यात आला. यामध्ये सुधीर मुनगंटीवार, छगन भुजबळ आणि दीपक केसरकर यांचा समावेश आहे. तर नितेश राणे, माधुरी मिसाळ, भरत गोगावले यांच्यासह २० नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Recharge : जिओचा स्वस्त रिचार्ज प्लान, 336 दिवसांची वैधता अन् अनलिमिटेड कॉलिंग, जाणून घ्या किंमत

WhatsApp मध्ये मोठा बदल, आई-वडिलांकडे राहणार तुमच्या प्रत्येक चॅटची माहिती; कसं ते वाचा

Maharashtra Live News Update : कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरात पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण

Chanakya Niti : ज्या व्यक्तीकडे असेल 'ही' अनमोल गोष्ट, त्याला पृथ्वीवरच स्वर्ग मिळेल

Goregaon Mulund Link Road: मुंबई-ठाण्याची वाहतूक कोंडी फुटणार; गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचं काम सुरु; वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT