Uttam Jankar On Ajit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar News : अजित पवारांचा ७५ हजार मतांनी पराभव होईल, उत्तम जानकरांचा दावा

Maharashtra Assembly Election 2024: रविवारी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सोमवारी उत्तम जानकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सुप्रिया सुळे यांच्या उरस्थितीत त्यांनी उर्यामेदवारी अर्ज भरला.

Priya More

Maharashtra Assembly Elections 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. नुकताच शरद पवार गटाकडून उत्तम जानकरांना उमेदवारी देण्यात आली. रविवारी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सोमवारी उत्तम जानकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करत असताना उत्तम जानकर यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. 'अजित पवारांचा ७५ हजार मतांनी पराभव होईल.' असा दावा उत्तर जानकरांनी केला आहे.

'अजित पवार यांच्या डोक्यावरील‌ हात काकांनी काढला आहे. आता तर ते बारामतीत आले आहेत. या निवडणुकीमध्ये अजित पवार यांचा सुमारे ७५ हजार मतांनी पराभव होईल.' असा दावा माळशिरसचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उत्तम जानकर यांनी केला आहे. मोहिते पाटील आणि मी एकत्रित आल्यामुळे या निवडणुकीत भाजप उमेदवाराचे डिपॉझीट जप्त करू असं जानकर यांनी म्हटले आहे.

उत्तम जानकर यांनी आज खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. माळशिरसच्या राजकारणात गेल्या वर्षापासून कट्टर विरोधक असलेले मोहिते पाटील आणि उत्तम जानकर या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्रित आले आहेत. त्यामुळे आता सोपूरमध्ये कोण बाजी मारते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आईचे दूध सर्वोत्तम! तुकाराम मुंढेंच्या नव्या ऑर्डरमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले, शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी ५ कडक नियम

Maharashtra News Live Update: पश्चिम विदर्भातील 56 तालुक्यात दुष्काळ जाहीर

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

Om Namah Shivaya Mantra Benefits: रोज १०८ वेळा ॐ नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो?

Chandrashekhar Bawankule : ओबीसींना आता १ रुपयात जमीन मिळणार! चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, सर्व विभागांना आदेश; पाहा सविस्तर

SCROLL FOR NEXT