Junnar Assembly Election 2024 Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: अतुल बेनके घड्याळावर लढणार, प्रचाराला सुरुवात; म्हणाले दादा-साहेबांना एकत्र आणणार!

रोहिदास गाडगे

Maharashtra Assembly Election: जुन्नरचे आमदार अतुल बेनके अजित पवारांची साथ सोडुन शरद पवार यांच्या गटामध्ये प्रवेश करत तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. पण या सर्व चर्चांना आमदार अतुल बेनकेंनी पूर्ण विराम दिला. आज सकाळी ओझरच्या विघ्नहर्ता गणपती मंदिरात त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी अतुल बेनकेंच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह असलेला पंचा देखील पहायला मिळाला. त्यामुळे आता अतुल बेनके अजित पवार गटाकडूनच विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे निश्चित झाले आहे.

अतुल बेनके घड्याळ चिन्हावर जुन्नरमधून विधानसभा लढणार असल्याचे निश्चित झालं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक संघ असल्याचा विश्वास व्यक्त करत त्यांनी अजित पवार आणि शरद पवार आपलेच असल्याचा नारा दिला आहे. त्यामुळे अतुल बेनकेंनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकसंघ असल्याचा केलेला दावा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सध्या त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ व्हायला पाहिजे यासाठी मी शेवटपर्यंत लढणार असा विश्वास आमदार अतुल बेनकेंनी मंत्री दिलीप वळसेपाटीलांसमोर व्यक्त करत शरद पवार आणि अजित पवार आपलेच असल्याचे मोठे विधान केले. आमदार बेनकेंनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे विधान केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. यावर अतुल बेनकेंना मंत्री करायचं असा विश्वासही वळसेपाटील यांनी सभेमध्ये व्यक्त केला.

राज्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. मात्र जुन्नर तालुक्याचा आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष एक कुटुंब आहे ते मी तुटुन देणार नाही असा विश्वास अतुल बेनकेंनी व्यक्त केला. त्यामुळे निवडणूकीच्या तोंडावर बेनकेंच्या या विधानाने राष्ट्रवादी कॉग्रेस पुन्हा एक होणार का? याची चर्चा रंगली असून बेनकेंच्या मनात नक्की चाललंय तरी काय? अशी देखील चर्चा सुरू झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री फडणवीस अॅक्शन मोडवर, सलमान खान धमकीनंतर गृह विभागाला निर्देश

Armaan Malik Accident: 'मरता मरता वाचलो...' बिग बॉस फेम अभिनेत्याच्या कारचा झाला अपघात; Video केला शेअर

मासिक पाळीविषयीचे समज आणि गैरसमज, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं, वाचा सविस्तर!

Diwali Festival: दिवाळीला दारात तेलाचा की तुपाचा दिवा लावावा?

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT