Abhijit Bichukale saam tv
महाराष्ट्र

Baramati Assembly Constituency: पवार विरुद्ध पवार लढाई, अभिजीत बिचुकलेंची उडी; बारामतीमध्ये तगडी फाइट

Abhijit Bichukale: बारामती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांनी उडी घेतली आहे. अभिजीत बिचुकले बारामतीमधून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

Priya More

राज्यातील बारामती विधानसभा मतदारसंघ सध्या चर्चेत आहे. या मतदारसंघामध्ये पवार विरुद्ध पवार फाइट पाहायला मिळत आहे. महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार निवडणूक लढवत आहे. बारामतीत काका विरुद्ध पुतण्यांमध्ये लढत होणार आहे. यामध्ये आता बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी उडी घेतली आहे. अभिजीत बिचुकले बारामतीमधून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यंदा बारामतीमधून निवडणूक लढवणार आहेत. अभिजीत बिचुकले यांनी आज बारामतीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. पवार विरुद्ध पवार लढाईमध्ये अभिजीत बिचुकले यांनी उडी घेतल्यामुळे चर्चा सुरू झाली आहे. बारामतीमध्ये तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. याआधी अभिजीत बिचुकले यांनी मुंबईतील वरळी, पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे.

अभिजीत बिचुकले कायम चर्चेत असतात. बिग बॉस मराठीमध्ये सहभागी झाल्यापासून ते जास्त चर्चेत आहेत. अभिजीत बिचुकलेंनी २०१९ मध्ये वरळी विधानसभा निवडणूक आदित्य ठाकरे यांच्याविरोधात लढवली होती. त्यांनी कसबा पेठ विधानसभेची पोटनिवडणुक देखील लढवली होती. पंढरपूर-मंगळवेढा निवडणूक देखील त्यांनी लढवली होती. २०२४ ची लोकसभा निवडणूक त्यांनी कल्याणमधून श्रीकांत शिंदेविरोधात लढवली होती.

अभिजीत बिचुकले यांनी आतापर्यंत अनेक निवडणूक लढवल्या. पण ते विजयी झाले नाही. त्यांना एकाही निवडणुकीमध्ये यश आले नाही. पण निवडणुकीमध्ये उभं राहणे, आरोप करणं आणि प्रचाराच्या माध्यमातून ते चांगलेच चर्चेत राहिले. त्यांनी नेहमीच ज्या मतदारसंघात उभे राहिले त्याठिकाणी उभे राहिलेल्या इतर पक्षांच्या उमेदवारांना चॅलेज दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khardi Kasara : लोकल प्रवाशांसाठी खूशखबर! कसारा-खर्डी मार्गावर सुरू झाली तिसरी मार्गिका; प्रवास होणार सुपरफास्ट

Maharashtra News Live Update: डोंबिवलीत पुलावर लटकून तरुणाचा गोंधळ; नागरिकांच्या धाडसामुळे टळली दुर्घटना

Dombivli Water Cut : डोंबिवलीत सलग ३६ तास पाणी बंद; MIDC कार्यालयावर नागरिकांची धडक

Martyred Policemen: शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांना मिळणार २ कोटींची मदत, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Daler Mehndi: 'गायक दलेर मेहंदी दारू पिऊन स्टेजवर आले'; त्या व्हायरल व्हिडिओने खळबळ, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT