BJP MLA Ranjitsinh Mohite Patil And Rahul Gandhi Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: माढ्यामध्ये मोठा राजकीय भूकंप, रणजितसिंह मोहिते पाटील भाजपला सोडचिठ्ठी देणार? चर्चांना उधाण

BJP MLA Ranjitsinh Mohite Patil: माढ्यामध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा राजकीय भूकंप होणार आहे. भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. भाजपचे विधानपरिषदचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. माढा विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत त्यांनी चाचपणी करण्यास सुरूवात केली आहे. जर महाविकास आघाडीमध्ये माढा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडला तर रणजितसिंह मोहिते पाटील यांचा विचार होऊ शकतो. रविवारी अकलूजमध्ये काँग्रेसची सभा झाली होती. सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूजमध्ये महाविकास आघाडीने शक्ती प्रदर्शन केले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीला सध्या मोठा फायदा होताना दिसत आहे. कोल्हापूरपाठोपाठ आता महाविकास आघाडीने सोलापूर जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले आहे. विजयसिंह मोहिते पाटील शरद पवारांसोबत गेल्यानंतर तिथे पाटील रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपसोबत राहणं पसंद केलं भाजपकडून विधानपरिषदेवर आमदार झाले. पण आता रणजितसिंह मोहिते पाटील हे आता काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपचे टेन्शन वाढणार आहे.

पण, रणजितसिंह मोहिते पाटील रविवारी सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसाच्या मेळाव्याच्या निमित्ताने अकलूजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर दिसले होते. यावेळी भाषण करताना 'सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी जी तडजोड करता येईल ती मी करायला तयार आहे.', असं ते बोलले. त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील परिवार हे पूर्णपणे महाविकास आघाडीच्या बाजूने आल्याची चर्चा आहे. जिल्ह्यात सोलापूरचा खासदार आणि माढ्याचा खासदार महाविकास आघाडीचा असल्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : कल्याणमध्ये पोलिसांकडून २ वर्षांच्या मुलीवर गंभीर गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण? Video

Chandrashekhar Bawankule : फोन टॅपिंगनंतर आता मोबाईल सर्व्हिलन्स? बावनकुळेंच्या वक्तव्याने राज्यात खळबळ, VIDEO

Saturday Horoscope : विनाकारण कामांमध्ये येणाऱ्या अडचणीमुळे मनोबल कमी होईल; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Government : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार; फडणवीस सरकारने उचललं मोठं पाऊल

Satara News : डॉक्टर महिलेचे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल, आत्महत्येपूर्वी काय घडलं? पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT