Maharashtra politics Live Updates in Marathi (9th February 2024) | Latest update on Abhishek Ghosalkar, Eknath Shinde, Dhangar Reservation, Mumbai, Nashik, Nagpur and all Maharashtra Saam TV
महाराष्ट्र

Breaking Marathi Batmya Live: पुण्यात शास्त्री रोडवर गोंधळ, महाविकास आघाडी, महायुतीचे कार्यकर्ते आक्रमक

Maharashtra Latest News in Marathi (9 February 2024): राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा.

प्रविण वाकचौरे

पुण्यात शास्त्री रोडवर गोंधळ, महाविकास आघाडी, महायुतीचे कार्यकर्ते आक्रमक

पुण्यात शास्त्री रोडवर गोंधळ महाविकास आघाडी आणि महायुतीचे कार्यकर्ते आक्रमक मोठी वाहतूक कोंडी

नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या निवडणूक समितीची घोषणा

काँग्रेसच्या निवडणूक समितीची घोषणा

नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली समिती

समितीत ५२ नेते आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश

असीम सरोदे यांच्या घरी पोलिसांचा मोठा फौजफाटा

निखिल वागळे आणि असीम सरोदे यांना सभे ठिकाणी जाऊ नका, पोलिसांची सूचना...

सभेच्या ठिकाणी सध्या महायुतीचे कार्यकर्ते आल्याने तणावाचे वातावरण...

तरीही वागळे आणि सरोदे सभेच्या ठिकाणी जाण्यावर ठाम.

तसेच काल निखिल वागळे यांच्यावर झालेल्या गुन्ह्या संदर्भात ही पोलिसांकडून चौकशी सुरू

मॉरिस नोरोन्हा यांच्या बॉडीगार्डला मुंबई गुन्हे शाखेने केली अटक

अंगरक्षकाला शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत अटक करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

अमरेंद्र मिश्रा असे या बॉडीगार्डचे नाव असून तो काही महिन्यांपूर्वी मॉरिससोबत होता.

उद्या गुन्हे शाखा अमरेंद्रला मुंबईच्या किल्ला कोर्टात हजर करणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री अमित शाहांची भेट घेणार

आज रात्री शाह यांच्या निवासस्थानी होणार भेट

राज्यसभा निवडणूक आणि राज्यातील परिस्थितीवर होणार चर्चा

सूत्रांची माहिती

पुण्यात महायुती, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमनेसामने

पुण्यात राष्ट्रसेवा दलाच्या बाहेर भाजपचं आंदोलन

पुण्यात महायुती, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमनेसामने

बोरिवलीतील ख्रिश्चन सिमेंटरी मध्ये मॉरिसचे पार्थिव दफन करण्यास विरोध?

वरळी येथील क्रिश्चन सिमेंट्री मध्ये होणार आहे

बोरिवलीतील ख्रिश्चन दफनभूमी मध्ये पोलिस सुरक्षा व्यवस्था तैनात

बोरिवलीतील ख्रिश्चन सिमेंटरी मध्ये मॉरिसचा मृतदेह दफन करण्यास स्थानिकांचा विरोध

मृत मॉरिस यांचे नातेवाईक पार्थिव घेऊन वरळीकडे रवाना

मृत मॉरिस याचे पार्थिव साधारण १५-२० मिनटांत दफनभूमी इथे पोहोचेल

बाळासाहेब ठाकरे यांनाही भारतरत्न द्या, राज ठाकरेंची मागणी

बाकी पी.व्ही नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग ह्यांना आणि काही वर्षांपूर्वी प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून, केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंच आहे तर मग हेच औदार्य त्यांनी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं.

अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थीवावर दौलतनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

अभिषेक घोसाळकर यांच्या सख्या भावाने दिला अग्नी

शरद पवार गटाचा नाशिक लोकसभेच्या जागेवर दावा

नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता

शरद पवार गटाचा नाशिक लोकसभेच्या जागेवर दावा

शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात

जिल्ह्यात ठाकरे गटापेक्षा शरद पवार गटाची ताकद जास्त असल्यानं नाशिकच्या जागेवर आमचा उमेदवार निवडून येईल

शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे यांचा दावा

भाजपने लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व खासदारांना 3 लाईनचा काढला व्हीप

उद्या म्हणजे 10 फेब्रुवारीला सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना

पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड

केशवनगर परिसरातील एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील चार जणांना मुंढवा पोलिसांनी अटक केली.तर, अन्य तिघेजण अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

ओबीसी - मराठा वाद फडणवीसांनी निर्माण केला; नाना पटोले

ओबीसी - मराठा वाद फडणविसांनी तयार केला.

ओबीसी आरक्षणाला हात न लावता मराठा आरक्षण देऊ हा सरकारनं दिलेला विश्वास आहे. यांच्यात मी कशाला पडू. माझा राजीनामा काय मागतायेत.

आज राहुल गांधींच्या विरोधात मोर्चे काढतायेत

मोदी ओबीसी आहेत असं ते सांगतायेत

पहिल्यांदा मोदी मुख्यमंत्री झाले तेव्हा बातम्या आल्या होत्या की गुजरातमध्ये सुपर अप्पर कास्टचा पहिला मुख्यमंत्री झाला

एस एस स्वामीनाथन, चौधरी चरणसिंग आणि नरसिंह राव यांना भारतरत्न जाहीर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग, माजी पंतप्रधान नरसिम्हा राव आणि हरितक्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न जाहीर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी आमने-सामने

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी आमने-सामने

पोलिसांची धरपकड सुरू

मुंबई येथे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी सुरू होते आंदोलन

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याही मुलाला पोलिसांनी घेतलं ताब्यात

अभिषेक घोसाळकर यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी ठेवण्यात आले

अभिषेक घोसाळकर यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी ठेवण्यात आले आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी पोहचले आहेत. थोड्याच वेळात उद्धव ठाकरे देखील येणार आहे. घोसाळकर यांच्या घराबाहेर शिवसैनिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवाण्यात आला आहे.

पुण्यात दारू तयार करण्यासाठी लागणारे 91 हजार लिटर रसायन पोलिसांनी केले उद्ध्वस्त

दारू तयार करण्यासाठी लागणारे 91 हजार लिटर रसायन पोलिसांनी केले उद्ध्वस्त

पुणे पोलीस गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाची धडाकेबाज कारवाई

तब्बल ३६ लाख रुपये किमतीचे दारू तयार करण्याचे हे रसायन

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचनेनंतर पोलिसांची अवैध व्यसायावर करडी नजर

या कारवाई मध्ये एकूण ३ आरोपींना अटक

लोणी काळभोर परिसरातील दारू भट्ट्या वरील ७ टाक्या उद्ध्वस्त

नाशिक शहरात आजपासून पुन्हा मनाई आदेश लागू

नाशिक शहरात आजपासून पुन्हा मनाई आदेश लागू

९ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारीपर्यंत १५ दिवसांसाठी शहरात मनाई आदेश लागू

मनाई आदेशाच्या कालावधीत पोलिसांच्या परवानगीशिवाय कुठल्याही प्रकारचे आंदोलन अथवा सभा घेता येणार नाही

स्फोटक पदार्थ, शस्त्र बाळगण्यास, शस्त्र जमा करण्यास अथवा विक्री करण्यास मनाई

मनाई कालावधीत पुतळ्याचे दहन करण्यास देखील सक्त मनाई

५ पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यासाठी पोलीस आयुक्तांची परवानगी आवश्यक

विना परवानगी मोर्चे, आंदोलनांना मनाई

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणावर काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांची संतप्त प्रतिक्रिया

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणावर काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांची संतप्त प्रतिक्रिया

सत्ताधारी लोकं महाराष्ट्राचा बिहार करत आहे, पोलिसांची भीती राहली नाही

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी राजीनामे दिले पाहिजे

पुरोगामी महाराष्ट्राला डाग लावणाऱ्या सत्ताधाऱ्याला जनता सोडणार नाही

सगळे गोळीबार करणारे म्हणतात आमचे बॉस सागर आणि वर्षा बंगल्यावर राहतात

समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या सिंदखेड राजा ते शेगाव मार्गाला राज्य मंत्री मंडळाची मंजुरी

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या लगत असलेल्या जिल्ह्यातील अनेक स्थळांना राज्य सरकार जोडण्याच्या प्रकल्पाला गती देताना दिसत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेडराजा ते संतनगरी शेगाव असा 109 किलोमीटरचा भक्तिमार्ग तयार करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.

आमदार गणपत गायकवाड यांचे तज्ज्ञांकडून समुपदेशन होण्याची शक्यता

उल्हासनगर पोलीस ठाण्यात झालेल्या गोळीबार प्रकरणात अटक आमदार गणपत गायकवाड हे गेल्या दोन दिवसंपासून कळवा पोलीस ठाण्यात जेवत नसल्याचे खात्रीलायक वृत्त

जेवत नसल्याने आमदार गणपत गायकवाड यांचे तज्ज्ञांकडून समुपदेशन होण्याची शक्यता

या प्रकरणात आमदार पुत्र वैभव गायकवाड आणि नागेश बढेकर अजून फरार

लवकरच दोघे पोलिसांच्या ताब्यात घेण्याची शक्यता

या प्रकरणात ठाणे जिल्ह्यातील गुन्हे अन्वेषण विभागाच्या सहा टीम कार्यरत

गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे या गुन्ह्याचे तपास अधिका

अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी मृत आरोपी मॉरिसविरुद्ध एफआयआर नोंदवला

बोरिवली अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी मृत आरोपी मॉरिस विरुद्ध एफआयआर नोंदवला आहे

मुंबई पोलिसांच्या MHB पोलिसांनी आयपीसीच्या कलम 302, शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम 3 आणि 25 आणि महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम 37 (1) (ए), आणि 135 नुसार गुन्हा दाखल केला.

अभिषेक घोसाळकर यांना चार गोळ्या लागल्याचे सूत्रांनी सांगितले. उजव्या मांडीला दोन गोळ्या, पोटात एक आणि छातीच्या डाव्या बाजूला एक गोळी लागल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले

या प्रकरणी गुन्हे शाखेकडून २ जणाची चौकशी सुरू

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यात वर्षा निवासस्थानी जवळपास अर्धा तास चर्चा

अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणाची गृहमंत्र्यांनी पोलिसांकडून घेतली माहिती

नेमकं प्रकरण कोणत्या वादातून घडलं याची घेतली माहिती - सूत्र

रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही देवेंद्र फडणवीस यांनी गोळीबार प्रकरणी चर्चा केल्याची माहिती

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यात वर्षा निवासस्थानी जवळपास अर्धा तास चर्चा

आठवड्याभरात दुसरे गोळीबार प्रकरण समोर आल्याने विरोधकांकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची होतेय मागणी

विदर्भातील मोबाईल व वायफाय सेवा प्रभावित

विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये रिलायन्स जिओ व त्याची वेन्डर कंपनी मेसर्स प्रताप टेक्नोक्राट कंपनी कार्यरत आहे. या प्रताप टेक्नोक्राट कंपनीतील जवळपास १२५० कामगार गुरुवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२४ पासून आपल्या विविध मागण्यासाठी बेमुदत संपावर गेले आहेत. सिटूच्या नेतृत्वाखाली हा संप सुरू झाला असून संपूर्ण विदर्भातून या संपाला कामगारांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. 

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात दोन जण ताब्यात

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात रोहित शाहू नावाच्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात

आतापर्यंत दोन जणांना पोलिसांनी चौकशीकरता ताब्यात घेतले 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माहिममधून अमित ठाकरे आघाडीवर

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT