CM Eknath Shinde Saam Tv
महाराष्ट्र

Ladaki Bahin Yojana: 'लाडकी बहीण योजना' कधीच बंद होणार नाही, PM मोदींसमोर मुख्यमंत्र्यांनी दिली गॅरंटी

Cm Eknath Shinde On Ladaki Bahin Yojana: पोहरादेवी येथे भाषण करताना मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठे वक्तव्य केले. 'लाडकी बहीण योजना' कधीच बंद होणार नाही, अशी गॅरंटी मुख्यमंत्र्यांनी दिली.

Priya More

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पीएम मोदींनी वाशिममधील पोहरादेवीच्या जगदंबा मातेच्या मंदिरात पूजा केली. यानंतर त्यांनी पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी संत सेवालालजी महाराज यांच्या समाधीवर पारंपरिक ढोल वाजवला. यानंतर पीएम मोदींनी बंजारा हेरिटेज म्युझियमचे उद्घाटन केले. यावेळी पोहरादेवी येथे पीएम मोदीची सभा झाली. या सभेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी भाषण करताना मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठे वक्तव्य केले. 'लाडकी बहीण योजना' कधीच बंद होणार नाही, अशी गॅरंटी मुख्यमंत्र्यांनी पीएम मोदी यांच्या समोर दिलं.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी भाषण करताना सांगितले की, पीएम मोदीजींनी सेवालाल महाराज यांचे सूत्र स्वीकरलं आहे. भारताला महान शक्ती बनण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. जो बायडन आणि मोदीजींची मैत्री मजबूत आहे. जगात देशाचा प्रभाव वाढत आहे. याचा आम्हांला अभिमान आहे. त्यांच्या आशीर्वादाने दोन वर्षांत राज्यातील विकासाला वेग आला आहे. लोकांच्या चेहऱ्यावर समाधान आहे. लाडकी बहीण योजना सुरु केली. बहिणींच्या खात्यात तीन हफ्ते ४५०० हजार रुपये गेले. पण विरोधक बोलतात की ही योजना आम्ही बंद करू. पण ही योजना कधी बंद होणार नाही.', असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, 'आपलं सरकार लाडकं सरकार झालं आहे. मोदी जेव्हा महाराष्ट्रात येतात तेव्हा नुसतं भाषण करत नाहीत. जलने वाले जलेंगे पर मोदीजींके नेतृत्व मे हम दुनिया पर राज करेंगे. मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. संजय राठोड यांनी सातत्याने प्रयत्न केला. तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस होते. पण मध्ये एक सरकार आले. मोदीजींनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. अनेक वर्षे अनेक लोकांना संधी होती. पण त्यांना योग मिळाला नाही. मोदीजी भुमिपूजन पण करतात आणि लोकार्पण करतात. मी त्यांचे आभार मानतो.'

तसंच, 'आज नंगाराचं लोकार्पण झाले. हा क्षण ऐतिहासिक आणि सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा असा दिवस आहे. आपल्यासाठी आनंदाचा क्षण आहे. आज इकडे काशी उभी राहिली आहे. बंजरा समाजाची संस्कृती, परंपरा सगळे दाखवले आहे. इकडे येण्याचा योग कोणा दुसऱ्या पंतप्रधानांच्या नशिबी नाही आला तो मोदीजींच्या नशिबी आला. डबल इंजिन सरकार सर्व वर्गाला न्याय द्यायचं काम करत आहे.' असे देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Shoking News : जेवणात मीठ कमी पडल्याने, गर्भवती महिलेला गमवावे लागले प्राण

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT