BJP’s Parag Sandhan and NCP’s Omprakash Koyate face off in Kopargaon civic election amid Mahayuti rift. Saam Tv
महाराष्ट्र

महायुतीत पुन्हा एकदा बिघाडी! भाजप-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत क्षुल्लक कारणावरुन वाद

BJP vs NCP Ajit Pawar Group Kopargaon Election: कोपरगावमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात बिघाडी झाली आहे. दोन्ही पक्षांनी नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्र उमेदवार जाहीर केल्याने राजकीय वातावरण तापलं आहे.

Omkar Sonawane

कोपरगावमध्ये महायुतीत फूट; भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट स्वतंत्र रिंगणात.

पराग संधान (भाजप) व ओमप्रकाश कोयटे (राष्ट्रवादी) यांची नगराध्यक्ष पदासाठी घोषणा.

काळे-कोल्हे संघर्ष पुन्हा उफाळला; स्थानिक राजकारणात तणाव.

दोन्ही गटांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होणार का? याकडे सर्वांचे लक्ष.

सचिन बनसोडे, साम टीव्ही

अहिल्यानगर: कोपरगावमध्ये महायुतीत बिघाडी झाल्याच बघलायला मिळतंय. नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून स्वतंत्र उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी पराग संधान यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर राष्ट्रवादीने ओमप्रकाश उर्फ काका कोयटे यांना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून घोषित केले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावगावमध्ये काळे आणि कोल्हे या कारखानदारांमधील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. वरिष्ठांच्या आदेशाने युतीचा धर्म पाळत भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांनी विधानसभा निवडणुक लढवली नव्हती. त्यामुळे विधानसभेला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आशुतोष काळे यांनी दणदणीत विजय मिळवत एक लाखाहून अधिक मताधिक्य घेतले होते.

मात्र नगरपरिषद निवडणुकीत स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे आणि विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनी एकमेकांविधात दंड थोपटले आहेत. कोल्हे यांनी समर्थकांचा मेळावा घेत भाजप आणि इतर मित्र पक्षांच्या वतीने नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाचे उमेदवार घोषित केले आहेत. तर आमदार आशुतोष काळे यांनी देखील समर्थकांचा मेळावा घेत राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार घोषित केलाय.

एकीकडे महायुतीचे वरिष्ठ नेते पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक एकत्र लढवण्याची भाषा करत असताना दुसरीकडे कोपरगावमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने स्वतंत्र सुभा मांडला आहे. त्यामुळे कोपरगावमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी या दोघांमध्ये काटे की टक्कर होणार? की दोघांच्या भांडणात पुन्हा तिसऱ्याचा लाभ होणार? हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लासलगावमध्ये अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; ३ किलोहून अधिक एमडी पावडर जप्त

Gold Rate Today: सोन्यामध्ये आतापर्यंत सर्वात मोठी वाढ, प्रति तोळा ₹५०२० रूपयांनी महागलं, पाहा २२k, २४k चे आजचे दर

Puff Sleeves Blouse Designs: फुग्याच्या हातांचा नवीन ट्रेंड, हे आहेत पफ स्लीव्हचे ब्लाऊजचे 5 ट्रेडिंग पॅटर्न

Shocking : लातूर हादरलं! नवऱ्याचा राग लेकीवर, संतापलेल्या आईने दीड वर्षाच्या मुलीवर चाकूने केले वार, जागेवर मृत्यू

Health Care : जेवणावर लिंबू पिळण्याचे जबरदस्त फायदे , जाणून घ्या

SCROLL FOR NEXT