Rajan Salvi News Saam tv
महाराष्ट्र

Rajan Salvi: निवडणुकीआधी ईडी चौकशी, आता उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याच्या तयारीत, शिवसेनेला कोकणात मोठा धक्का

Konkan political updates: ठाकरे गटाचे नेते राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. एका महिन्यात ते ठाकरे गटाला रामराम ठोकणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Priya More

कोकणामध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. कारण राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि ठाकरे गटाचे प्रमुख नेते राजन साळवी पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी नाराज असून ते ठाकरे गटाची साथ सोडणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.

निवडणुकीत आणि निवडणूकीनंतर वरिष्ठ नेत्यांनी दखल न घेतल्याची भावना राजन साळवी यांच्या मनात आहे. यासोबतच कुटुंबियांच्या मागे पुन्हा एसीबीचा ससेमिरा लागण्याची राजन साळवी यांना चिंता आहे. महिनाभरात राजन साळवी पक्ष सोडण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे. राजन साळवी भाजपसोबत जाणार की शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार याबाबत वेगवेगळ्या चर्चा जिल्ह्यामध्ये सुरू आहेत. राजन साळवी यांनी ठाकरे गटाची साथ सोडली तर कोकणात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडू शकते.

भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याबाबत होत असलेल्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना राजन साळवी यांनी मंगळवारी सांगितले होते की, भाजपमधील प्रवेशाच्या चर्चेबाबत ते म्हणाले की, 'मी बाळासाहेबांचा लाडका शिवसैनिक आहे. त्यांना अभिप्रेत असलेले कामं मी आजपर्यंत केली आहेत. त्यांच्याच विचारांचे काम मी पुढे नेणार आहे.', असे सांगितले होते. पण आता जिल्ह्यामध्ये ते ठाकरे गटाला रामराम करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

राजन साळवी हे ठाकरे गटाचे कोकणातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. नगरसेवक, नगराधयक्ष, जिल्हाप्रमुख, ३ वेळा आमदार आणि आता ते ठाकरे गटाचे उपनेते आहेत. सराकरने त्यांची वाय प्लस सुरक्षा काढून घेतली त्यामुळे सध्या ते खूपच नाराज झाले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती.

पण आता सरकार बदलल्यानंतर त्यांची वाय प्लस सुरक्षा काढून घेण्यात आली. त्यांना निवडणुकीपूर्वी जिल्हा पोलिस अधिक्षकांनी फक्त एकच पोलिस दिला आहे. त्यामुळे माझं काही बरं वाईट झालं तर याची जबाबदारी सरकारची राहिल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री आता रस्त्यावर मागतेय भीक, फोटो पाहून बसेल धक्का

Accident : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! कार ५०० फूट खोल दरीत कोसळली, ८ जणांचा जागीच मृत्यू

शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातील भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुले; मात्र दररोज 'इतक्याच' भाविकांना प्रवेश

Cheese Balls Recipe: लहान मुलांसाठी घरच्या घरी झटपट बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट चीज बॉल्स, वाचा सोपी रेसिपी

6,600 रुपयांच्या फायद्यासाठी 22 बळी, दारूकांडाची थरारक इनसाईड स्टोरी, आरोपी वानखेडेनं कसा रचला प्लॅन?

SCROLL FOR NEXT