Maharashtra Politics SAAM TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस दावा करणार? महाविकास आघाडीची आज महत्त्वाची बैठक

Monsoon session of Maharashtra Assembly: राष्ट्रावदीत दोन गट पडल्यामुळे राष्ट्रवादीकडे असलेल्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसकडून दावा केला जाण्याची शक्यता आहे.

Chandrakant Jagtap

Maharashtra Assembly Monsoon Session Updates: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. राष्ट्रावदीत दोन गट पडल्यामुळे राष्ट्रवादीकडे असलेल्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसकडून दावा केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अधिवेशनात नेमका विरोधी पक्षनेता कोण? या चर्चेला उधाण आले आहे.

अजित पवार युती सरकारमध्ये सामील झाल्याने विरोधीपक्ष नेते पद रिक्त आहे. या पदावर काँग्रेसकडून दावा केला जाऊ शकतो. त्यामुळे काँग्रेस दावा करणार का आणि केला तर विरोधी पक्षनेता कोण होणार ही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

विधानसभेत विरोधी पक्षनेता कोण?

अधिवेशनापूर्वी आज महाविकासआघाडीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदावर चर्चा होण्याची शक्यता आहे. याच बैठकीत काँग्रेकडून या पदावर केला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

देवगिरीवर मंत्र्यांची महत्त्वाची बैठक

दरम्यान उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देवगिरीवर महत्वाची बैठक पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांची ही बैठक पार पडेल. सकाळी ११ वाजता ही बैठक होणार असून त्यात अधिवेशनाच्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. (Tajya Marathi Batmya)

राष्ट्रवादीत कोणाचा व्हीप लागू होणार?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता दोन्ही गट पक्षातील आमदारांना व्हीप बजावण्याची शक्यता आहे. असे झाल्यास या अधिवेशनात नेमका कोणाचा व्हिप चालणार? हे पाहावं लागणार आहे. अजित पवार गटाकडून व्हीप जारी करणार असल्याची माहिती प्रतोद अनिल पाटील यांनी दिली आहे. तसेच तो न पाळणाऱ्यांवर पक्षश्रेष्टी योग्य ती कारवाई करतील असेही त्यांनी म्हटले आहे. (Latest Political News)

दुसरीकडे, शरद पवार गटाकडून प्रतोद म्हणून जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा व्हिप लागू होणार का? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याबाबत काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उज्ज्वला थिटेंना धक्का, अनगरचा नगराध्यक्ष ठरला; जिल्हा न्यायालयानं नेमका निकाल काय दिला? VIDEO

India Tourism : काश्मीर-मनाली नाही; गुलाबी थंडीत आवर्जून फिरा 'हे' ठिकाण, जोडीदार होईल खुश

Blouse Fitting Tips: पहिल्यांदा ब्लाउज शिवायला देताय? मग परफेक्ट फिटींगसाठी लक्षात ठेवा या ट्रिक्स

Maharashtra Live News Update: हसन मुश्रीफ यांची पुन्हा शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका

भाजपप्रणित NDA ला मोठा हादरा; घटक पक्षातील प्रमुख नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा

SCROLL FOR NEXT