Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: ठाकरेंच्या प्लॅनला शिंदेंचा सुरुंग? भावाला धोका, राज देणार शिंदेंना टाळी?

Uddhav Thackeray- Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. याबाबत दोन्ही पक्षांचे नेते मंडळी देखील सकारात्मक आहेत. पण मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आता शिंदे गट मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहे.

Priya More

भरत मोहोळकर, साम टीव्ही

ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच शिंदे गटाने मोठा डाव टाकलाय. शिंदे गट थेट राज ठाकरेंनाच गळाला लावण्याची योजना आखतोय. ती नेमकी कशी? त्याची कारणं काय आहेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना शिंदे गटाकडून सुरुंग लावण्याची रणनीती आखण्यात आलीय. राज ठाकरेंसोबत युतीसाठी शिंदे गटाचे मंत्री उदय सामंतांचे विशेष प्रयत्न सुरु आहेत. तर युतीची चर्चा पुढे नेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे डिनर डिप्लोमसीची योजना आखत असल्याची माहिती समोर आलीय. मात्र यामागची रणनीती नेमकी काय आहे?

मुंबईत शिवसेना आणि ठाकरे ब्रँडचं विशेष महत्व आहे. शिवसेनेसोबत ठाकरे ब्रँड स्वतःकडे घेण्यासाठी शिंदेंचा प्रयत्न सुरू आहे. राज ठाकरे शिंदे गटासोबत गेल्यास मराठी मतांचा फायदा होणार आहे. मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये एकत्र येण्याची इच्छा, मात्र नेत्यांचा थंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे शिंदेंकडून राज ठाकरेंना टाळी देण्याची तयारी सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गटाची मोठी पिछेहाट झाली. मनसेला तर भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे ठाकरे ब्रँड जपण्यासाठी आणि आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर दोन्ही बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरु होती. अनेक शहरांमध्ये कार्यकर्त्यांचंही मनोमिलन झाल्याचं समोर आलं. दरम्यान एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या घरी स्नेहभोजनासाठी गेले होते.

तर उद्योगमंत्री उदय सामंत आणि मनसेचे नेते एकमेकांच्या संपर्कात असल्याचं दिसून आलं. त्यामुळे आता ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच शिंदे गटाने राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरु केलेत. तर यासंदर्भात विचारांचा धागा एकच असल्याचं सांगत सामंतांनी याआधीच युतीचे संकेत दिलेत. तर दादा भुसेंनी मात्र युतीसंदर्भातील चेंडू राज ठाकरेंच्या कोर्टात टाकलाय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतरच मनसे-ठाकरे गटाच्या युतीला ब्रेक लागल्याची चर्चा होती. मात्र ठाकरे गट युतीबाबत आशादायी होता. आता शिंदे गटाने युतीसंदर्भात हालचाली सुरु केल्याने राज ठाकरे शिंदेंना प्रतिसाद देणार की ठाकरे ब्रँड जपण्यासाठी भावाला टाळी देणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Update : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल! १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ प्रमुख रस्त्यांवर जड-अवजड वाहनांना नो एन्ट्री

Maharashtra News Live Update: रायगडच्या पेण मधुन यंदा 70 लाखांहून अधिक गणेश मूर्तींची विक्री

Kitchen Tips : नॉन- स्टिक पॅनची कोटिंग निघतेय? पॅन वापरताना तुम्ही या चुका तर करत नाही ना?

Madh Versova bridge: मढ-वर्सोवा प्रवास आता फक्त ५ मिनिटांत? उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुलाच्या कामाला हिरवा कंदील

Ganpati Decoration Ideas: लाडक्या गणरायासाठी 7 सुंदर मखर डेकोरेशन; घराला मिळेल एकदम रॉयल लूक

SCROLL FOR NEXT