Hasan Mushrif News Saamtv
महाराष्ट्र

Hasan Mushrif News: ...नाहीतर जयंत पाटलांनीही आमच्यासोबत शपथ घेतली असती; हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट, नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Politics: अजित पवार गटाचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. "

Gangappa Pujari

रणजित माजगावकर, प्रतिनिधी

Hasan Mushrif News:

जयंत पाटील एका घटनेमुळे बचावले, नाही तर त्यांनी सुद्धा आमच्या सोबत शपथ घेतली असती... असा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात केला. मुश्रीफांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली. दोन्ही गटाकडून सध्या राष्ट्रवादी (NCP) पक्ष आणि चिन्हावर दावा केला जात असून यासंबंधीची सुनावणी सध्या निवडणूक आयोगासमोर सुरू आहे. अजित पवार आणि शरद पवार गटाकडून खरा पक्ष आमचाच असल्याचा दावा केला जात आहे.

अशातच अजित पवार गटाचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. "जयंत पाटील (Jayant Patil) हे एका गोष्टीमुळे आमच्यासोबत आले नाहीत, अन्यथा त्यांनी आमच्यासोबतच शपथ घेतली असती.." असा गौप्यस्फोट हसन मुश्रीफ यांनी केला.

तसेच "ती गोष्ट नेमकी काय आहे ते मी वेळ आल्यावर स्पष्ट करेन.'' असेही ते म्हणाले. हसन मुश्रीफ यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, कोल्हापूरमध्ये (Kolhapur) मराठा आंदोलकांनी मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांची गाडी अडवल्याचा प्रकार समोर आला आहे.

यावेळी मराठा समाजाला आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर सरकारने फसवल्याची भावना नागरिकांना व्यक्त केली. हसन मुश्रीफ यांनी देखील मराठा समाजाच्या भावना समजून घेतल्या आणि लवकरच मराठा समाजाला आरक्षण मिळणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: लग्नानंतर देवदर्शनाला गेले असता नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू ; माकडांना पाहून घाबरली, पळत असताना दरीत पडली

Maharashtra News Live Update: हरामखोर गेले पण शिवसैनिक हलला नाही - उद्धव ठाकरे

मुंबईत ३०००० लोकांचा जीव होता धोक्यात? मोहरम मिरवणुकीतला 'विषारी' कट उधळला, १४,९०० कॅप्सूल जप्त

Mumbai Water Update : मुंबईकरांची चिंता वाढली! पाऊस लांबला, धरणांनी तळ गाठला; सातही धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा शिल्लक?

July 1 Rule Change : १ जुलैपासून देशात 5 मोठे बदल; LPG, ATM ते HDFC कार्डधारकांवर होणार थेट परिणाम

SCROLL FOR NEXT