Maharashtra Politics x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : शिंदेंचा नेता आणि माजी आमदाराला एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा, काय आहे प्रकरण?

Maharashtra Political News : शिवसेना शिंदे गटातील नेता आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कोर्टाने एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्या विरोधात अटक वॉरंटही जारी झाले होते.

Yash Shirke

  • माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा

  • शासकीय कामात अडथळा आणि मारहाण प्रकरणात ठरले दोषी

  • हर्षवर्धन जाधव हे भाजप आमदार संजना पाटील यांचे पूर्वाश्रमीचे पती आहेत.

  • संजना पाटील या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत.

पराग ढोबळे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Maharashtra : कन्नड मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना न्यायालयाने एका वर्षाची कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सरकारी कामामध्ये अडथळा आणण्याच्या प्रकरणात दोषी आढळल्याने हर्षवर्धन जाधव यांना जिल्हा सत्र न्यायालयाद्वारे शिक्षा सुनावण्यात आली आहे. जाधव यांच्याविरुद्ध अटक वॉरंटदेखील जारी करण्यात आला होता.

६ डिसेंबर २०१४ रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची हॉटेल प्राइडमध्ये शिवसेना पक्षातील नेत्यांसोबत बैठक सुरु होती. या बैठकीस आत जाऊ देण्यास मज्जाव केल्याने हर्षवर्धन जाधव यांनी पोलीस निरीक्षक पराग जाधव यांच्या कानशिलात लगावली होती. या प्रकरणी सोनेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शासकीय कामात अडथळा आणणे आणि पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करणे या प्रकरणी न्यायालयाने हर्षवर्धन जाधव यांच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी केला होता. वॉरंट निघाल्यानंतरही न्यायालयात हजर न राहिल्याने जाधव यांच्या विरोधात नॉन बेलेबल वॉरंट काढण्याचे न्यायालयाने आदेश दिले होते. १७ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर झाल्यानंतर त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्याच प्रकरणाचा आज (६ ऑगस्ट) निकाल लागला आहे. या प्रकरणात शासनातर्फे ॲड. चारुशीला पौनिकर यांनी आणि हर्षवर्धन पाटील यांच्या बाजूने ॲड. प्रकाश जयस्वाल यांनी युक्तिवाद केला.

तत्कालीन शिवसेना पक्षाचे माजी आमदार आणि आता शिंदे गटात असलेले हर्षवर्धन जाधव हे कन्नड (छत्रपती संभाजीनगर) विधानसभेचे माजी आमदार आहेत ते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. विधानसभा निवडणुकीत जाधव यांनी अर्ज दाखल केला होता. हर्षवर्धन जाधव यांचा पराभव त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी संजना जाधव यांनी केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack risk: दररोजच्या या ५ सवयी तुमच्या हृदयाला पाडतायत आजारी; डॉक्टरांनी सांगितलं कशी घ्याल काळजी?

Ladki Bahin Yojana: e-KYCमध्ये ८६ लाख लाडक्या बहिणी अपात्र,₹१५०० कायमचे बंद, इतक्या महिलांनाच मिळणार लाभ

Maharashtra Live News Update : गोरेगावमध्ये कार व बेस्ट बसची समोरासमोर धडक, अपघातात चालक जखमी

Ayesha Khan : 'धुरंधर'च्या यशामुळे मोठ्या चित्रपटाची लॉटरी, अक्षय कुमारसोबत दिसणार 'शरारत' फेम आयशा खान

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याची किंमत बदलली, वाचा २४k, २२k गोल्डचे ताजे दर

SCROLL FOR NEXT