महाराष्ट्र

Raigad Guardian Minister: भरत गोगावले की तटकरे? तिढा सुटला पण, रायगडचं पालकमंत्रिपद गेलं कोणाकडं?

Raigad Guardian Minister Dispute: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या चर्चेदरम्यान, महायुती आघाडीने रायगड पालकमंत्रीपदाचा वाद मिटण्याची शक्यता आहे. भरत गोगावले यांना हे पद मिळण्याची दाट शक्यता आहे.

Bharat Jadhav

  • रायगड पालकमंत्रिपदाचा तीन वर्षांपासूनचा तिढा सुटण्याची शक्यता.

  • भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्रीपद मिळण्याची चर्चा.

  • शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागावाटपावर समझोता.

गणेश कवाडे, साम प्रतिनिधी

विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू असताना महायुतीच्या डोकेदुखी ठरत असलेला प्रश्न तीन वर्षानंतर सुटलाय. हा तिढा म्हणजे रायगडचं पालकमंत्रिपद कोणाला द्यायचा. विधान परिषदेच्या मतदारसंघांवरुन तोडग्यासाठी चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असतानाच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पालकमंत्रिपदाच्या तिढ्यावर हुकूमी मार्ग काढल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

शिवसेनेने रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ राष्ट्रवादीला अर्थात खासदार सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत यांना सोडण्यात आला आहे. त्याबदल्यात रायगडचे पालकमंत्रिपद भरत गोगावले यांना देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ जागांसाठी विधान परिषद निवडणूक होतेय. महायुती म्हणूनच एकत्र जागा लढवण्याचा निर्धार महायुतीतील तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी केला.

त्या अनुषंगाने जागावाटपाच्या तिढ्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे तिघे एकत्र चर्चा करीत आहेत. मात्र, अजून अंतिम तोडगा निघालेला नाही. भाजप १२, शिवसेना ३ आणि राष्ट्रवादी काँग्रेस २ जागा लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. महायुतीत याबाबत चर्चा सुरू असतानाच शिवसेना आणि राष्ट्रवादीने रायगडचा प्रश्न मार्गी लावलाय.

रायगडच्या पालकमंत्रिपदावरून तिढा जवळपास चार वर्षांच्या काळापासून कायम होता. मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीत त्याच्यावर मार्ग निघाला. विशेष म्हणजे रायगडमध्ये शिवसेनेची ताकद जास्त असताना राष्ट्रवादीला जागा सोडण्यात आल्या आहेत. परंतु असे असताना सुद्धा राष्ट्रवादीच्या पक्षात अंतर्गत वाद सुरू आहे. तटकरेंनी आपला राजकीय स्वार्थ साधला पण पक्षाच्या हाती काही आले नाही अशी चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सुरू आहे.

पालकमंत्रिपद रिक्त आहे. शिवसेनेकडून भरत गोगावले यांच्यासाठी तर, राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे यांच्यासाठी आग्रह धरण्यात येत आहे. मात्र, या निवडणूकीच्या निमित्ताने या वादावरच तोडगा काढण्यात आला आहे. गेल्या वेळी सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे हे रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जांभूळ खाणे सर्वांसाठीच फायदेशीर नाही! 'या' ५ गंभीर समस्या असल्यास चुकूनही खाऊ नका

UPI Users Alert: ...तर तुमचं UPI पेमेंट तात्काळ ब्लॉक होणार, बँकांनं घेतला मोठा निर्णय

Riteish - Raja Shivaji Collection : रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' सुपरहिट! मराठीसोबत हिंदी सिनेमांनाही टाकले मागे, वाचा छप्परफाड कमाई

Maharashtra News Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील निवासस्थानाबाहेर आंदोलन

Diabetes-High BP : मधुमेह अन् बीपी कंट्रोल करतील 'हे' ५ सुपरफूड, वजनही होईल झटपट कमी

SCROLL FOR NEXT