Maharashtra Politics saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे, शरद पवारांना धक्का; कल्याणमधील नेत्यांसह पदाधिकाऱ्यांचा शिंदेसेनेत प्रवेश

Maharashtra Political News : ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यात ठाकरे गट, शरद पवार गट आणि मनसे या पक्षातून अनेक नेते, पदाधिकारी यांचा शिंदे गटात प्रवेश झाला.

Yash Shirke

  • ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मोठा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला.

  • महाविकास आघाडीतील अनेक नेते, पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

  • एकाच वेळी शिंदे यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना धक्का दिला आहे.

विकास काटे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Maharashtra : ठाण्यामध्ये टेंभी नाका या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लाडक्या बहिणींसह रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला अभिनेत्री दिपाली सय्यद, रेणुका शहाणे यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते. रक्षाबंधनाच्या कार्यक्रमापूर्वी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आनंद आश्रमामध्ये मोठा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. अंबरनाथ, कल्याण या ठिकाणांहून अनेक नेते, पदाधिकारी पक्षप्रवेशासाठी जमले होते.

कल्याणमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाला हादरा बसला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माजी नगरसेवक उमेश बोरगावरकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. बोरगावकर यांच्यासह अनेक पदाधिकारीही शिंदे गटात सामील झाले. यासोबतच कल्याण पश्चिममधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील महिला पदाधिकारी अक्षया दळवी यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यामुळे कल्याणमध्ये शरद पवार गट आणि ठाकरे गट यांना धक्का बसला आहे.

दुसऱ्या बाजूला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये अंबरनाथमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक कुणाल भोईर यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. पदाधिकाऱ्यांमध्ये मनसे जिल्हा संघटक संदीप लकडे, शहर संघटक स्वप्नील बागुल आणि माजी नगरसेविका अपर्णा भोईर यांचा समावेश आहे.

एकनाथ शिंदे यांनी एकाच वेळी मनसे, शरद पवार गट आणि ठाकरे गट यांना धक्के दिले आहेत. यामुळे एकूणच महाविकास आघाडीची शक्ती कल्याण, अंबरनाथ आणि आसपासच्या परिसरात कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीला गळती लागल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भंडाऱ्यात बीटीबी भाजी मार्केटच्या व्यापाऱ्यांना जिल्हा न्यायालयाचा मोठा दिलासा

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT