स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं बिगूल वाजलं असतानाच ऑपरेशन लोटसवरुन महायुतीत वादाची ठिणगी पडली...तर मुख्यमंत्री फडणवीसांनी तोडगा काढल्यानंतरही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट दिल्ली गाठत रवींद्र चव्हाणांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत अमित शाहांसमोर तक्रारीचा पाढा वाचलाय..
शिंदेंचा वाचला तक्रारीचा पाढा?
रवींद्र चव्हाण सेनेच्या माजी नगरसेवकांना पैसे देऊन फोडत आहेत
निवडणुकीत पोषक वातावरण असताना भाजपकडून वातावरण कलुषित कऱण्याचा प्रकार
सेना महायुतीचा घटकपक्ष असतानाही आमच्या मंत्र्यांची कोंडी केली जात आहे
आम्ही खरी शिवसेना असतानाही उद्धव ठाकरेंची बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक अध्यक्षपदी नियुक्ती
अमित शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी आपण तक्रार करण्यासाठी दिल्लीत आलो नव्हतो, अशी सारवासारव केलीय...एवढंच नाही तर यापुढे फोडाफोडीला ब्रेक लावण्याचे आदेश शिंदेंनी स्वपक्षाच्या नेत्यांना दिलेत...
अमित शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी मवाळ भूमिका घेतली असली तरी अमित शाहांनी मात्र भाजपला नंबर एकचा पक्ष करण्यासाठी राज्यातल्या भाजप नेत्यांच्या पाठीशी असल्याचं सांगत शिंदेंची मागणी धुडकावून लावल्याची चर्चा आहे.
त्यामुळे दिल्लीतली भेटही शिंदेंच्या अंगलट आल्याचं दिसंतय. तर दुसरीकडे शिंदेंच्या सूचनेनंतही आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीत चक्कं भाजपचा उमेदवार भास्कर बांगर यांनाच पळवलंय.... त्यामुळे भाजप याचा आणखी आक्रमकपणे वचपा काढणार की सबुरीची भूमिका घेणार याकडे लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.