शिंदेसेनेने आक्रमक प्रचार करत ठाकरेसेनेला निवडणुकांत मोठा धक्का दिला
ठाकरेसेनेने अनेक निवडणुकांत सभा घेतल्या नाहीत
शिंदेसेनेचा ग्रामीण भागात झपाट्याने विस्तार होत आहे
2029 निवडणुकीसाठी शिंदेसेनेने आत्तापासूनच तयारी सुरू केली
महापालिका, जिल्हा परिषदा आणि विधानसभेतील ठाकरेसेनेची कार्यपद्धती पाहता ठाकरेसेना फक्त मुंबईपूर्ती मर्यादीत राहिलीय का? असा सवाल उपस्थित केला जातोय. त्यामुळे शिंदेसेनेनं निवडणुकांमध्ये ठाकरेसेनेला कसं धोबी पछाड दिलाय? पाहूयात या रिपोर्टमधून...
शिवसेनेतील बंडानंतर शिंदेंनी उद्धव ठाकरेंकडून सत्ता, मुख्यमंत्रीपद, आमदार, खासदार, नगरसेवक आणि शिवसेना हा पक्ष तसंच धनुष्यबाणही काढून घेतलं. त्यानंतर झालेल्या निवडणूकांमध्ये शिंदेंनी ठाकरेंच्या तोडीसतोड काम करत खासदार, आमदार आणि नगरसेवक निवडून आणून आपलीच शिवसेना खरी असल्याचं प्रत्येक निवडणूकीत दाखवून दिलं.जिल्हा परिषदांच्या निमित्तानंही.
आता गावागावात ठाकरेंकडे उरलेले शिवसैनिकही शिंदे आपल्याकडे वळवण्यासाठी पायाला भिंगरी लावून 2029 जिंकण्याच्या उद्देशानं काम करत असल्याचं दिसलंय. बाळासाहेबांनी दिलेल्या गाव तिथे शाखा या घोषणेचा विस्तार करत शिंदेंनी आता घर तिथे शिवसैनिक, गाव तिथे शाखा हा नारा देत कार्यकर्त्यांच्या निवडणूकांमध्ये झोकून देऊन काम करत असल्याचं दिसलंय.
एकनाथ शिंदे- अंदाजे 53 सभा
उद्धव ठाकरे- 0 सभा
एकनाथ शिंदे- अंदाजे 30+ सभा
उद्धव ठाकरे- 3 सभा
एकनाथ शिंदे - 30 + सभा
उद्धव ठाकरे - 0 सभा
विधानसभा निवडणूकीत उद्धव ठाकरेंनी पक्ष आणि बाप चोरल्याचा आरोप करत शिंदेंना डिवचलं त्यानंतर लागलेल्या निकालात ठाकरेंना केवळ 20 तर शिंदेंना 57 जागा जिंकण्यात यश आलं. शिंदेंनी गद्दारच्या टिकेला खुद्दारचा विचार मांडत निवडणूकांमध्ये कार्यकर्त्यांच्या मागे ताकद उभी करत ठाकरेंचा उरला सुरलेला ग्रामीण कणाही मोडून काढत थेट 2029 ची मोठी खेळी सुरु केल्याच दिसलंय. यामुळे शिंदेंना काय फायदा होऊ शकतो तो म्हणजे महायुतीतील स्थान मजबूत होणार आहे. शहरासोबतच ग्रामीण भागात शिवसेनेचा विस्तार होईल. काँग्रेस - राष्ट्रवादीची पडझड शिंदेंच्या पथ्यावर. ठाकरेंना मुंबई पुरतं मर्यादित करण्याची खेळी.
राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शिंदेंच्या शिवसेनेसाठी मोकळं मैदान असून शिंदेंकडून जोरदार बँटिंग सुरु आहे असंच दिसतंय. भाजपसोबतची युती, राष्ट्रवादीचं अस्थिर चित्र आणि ठाकरे बंधूचं घराच्या चौकटीत बसून सुरु असलेलं राजकारण अशा परिस्थिती शिंदे पायाला भिंगरी बांधून प्रचार करतायेत. शिंदे आणि ठाकरे दोघे राज्याचे माजी मुख्यमंत्री तरी देखील ठाकरे बंधू युती करुनही निवडणूकांमध्ये प्रचारासाठी का फिरत नाहीत. सभा रोड शो घेऊन कार्यकर्त्यांच्या मागे ताकद का उभी करत नाहीत हे मात्र अनाकलनीय आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.