Devendra Fadnavis
Devendra Fadnavis saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : पवारांच्या विधानानंतर फडणवीसांची गुगली! पहाटेच्या शपथविधीचा ट्विस्ट आणखी वाढवला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtra Politics : काही दिवसांपूर्वी फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी पवारांशी चर्चेनंतरच झाला होता असा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर त्यावर सर्वच पक्षातील राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी असत्याचा आधार घेतला असे म्हटले होते. त्यानंतर आता पुन्हा पवारांनी यासंदर्भात आणखी एक मोठे विधान केले आहे.

पहाटेच्या शपथविधीविषयी फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक मोठे विधान केले आहे. 'अजित पवारांनी यावर बोलायची गरज काय? पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आला आहे.

शरद पवार आज चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना पहाटेच्या शपथविधीबाबत अप्रत्यक्षरित्या एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. या विषयावर अजित पवारांनी बोलायची गरज काय? पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? असा अप्रत्यक्षरित्या टोला देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. (Latest Marathi News)

देवेंद्र फडणवीस यांची गुगली...

शरद पवारांच्या या वक्तव्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. 'बरं झालं आता त्यांनी स्वत:च याबद्दल खुलासा केला' असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच 'आता एवढं बोलले तर राष्ट्रपती राजवट का लागली? त्यामागे कोण होते? कोणाच्या सांगण्यावरून लागली आणि त्याच नेमकं कारण काय? अश्या सगळ्या गोष्टींचाही ते खुलासा करतील ही माझी अपेक्षा आहे, अशी गुगली देखील फडणवीस यांनी टाकली आहे. या सगळ्या कड्या जोडल्या तर सगळ्या गोष्टी अजून स्पष्ट होतील, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi आणि एपी ग्लोबालेचे संस्थापक अभिजीत पवार यांची नवी दिल्लीत भेट

Explainer : लोकल गर्दीमुळे आणखी किती रियांचे बळी जाणार? डोंबिवली - कोपरदरम्यानच घटना का घडताहेत?

MI Vs LSG : लखनौच्या गोलंदाजांसमोर मुंबईचा संघ गडगडला; लखनौसमोर १४५ धावांचं लक्ष्य

Modi VS Pawar | राजकारणातील भटकती आत्मा कोण? मोदी-पवारांमध्ये जुंपली

Today's Marathi News Live : ठाण्याच्या जागेचा मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य, प्रताप सरनाईक

SCROLL FOR NEXT