Yashomati Thakur on Navneet Rana Statement Saamtv
महाराष्ट्र

Yashomati Thakur News: कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आक्रमक! नवनीत राणांविरोधात ठोकणार १०० कोटींचा दावा; प्रकरण काय?

Yashomati Thakur on Navneet Rana Statement: राणा दांपत्य आणि कॉंग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्यामधील वादानंतर अमरावतीचे राजकारण चांगलेच तापले आहे.

Gangappa Pujari

अमर घटारे, प्रतिनिधी

Amravati News:

अमरावतीच्या राजकारणात सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरीने वातावरण चांगलेच तापले आहे. खासदार नवनीत राणा यांच्या वक्तव्याविरोधात कॉंग्रेस आमदार यशोमती ठाकूर कायदेशीर लढा देणार आहेत. यशोमती ठाकूर या नवनीत राणा यांच्या विरोधात 100 कोटी रूपयांचा अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, नवनीत राणा (Navneet Rana) यांनी कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यशोमती ठाकूर यांनी रवी राणा यांच्याकडून पैसे घेतले. मात्र प्रचार दुसऱ्याचा केला, असे त्या म्हणाल्या होत्या.

नवनीत राणा यांच्या या वक्तव्यानंतर आमदार यशोमती ठाकूर यांनी आक्रमक भूमिका घेत कायदेशीर लढाईचा इशारा दिला आहे. यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणा यांच्याविरोधात १०० कोटींच्या अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहेत.

काय म्हणाल्या यशोमती ठाकूर?

"लोकसभा निवडणूकीच्या काळात जर मला पैसे दिले असतील तर त्याची माहिती निवडणूक आयोगाकडे नाही का? एवढा मोठा आरोप झाल्यानंतरही राणा दांपत्यावर कारवाई का होत नाही? ईडी, सीबीआय काय करत आहे? असे सवाल आमदार ठाकूर यांनी उपस्थित केले.

तसेच यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावरही निशाणा साधला. "फडणवीसांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही, मात्र ते दहीहंडीच्या कार्यक्रमात जातात. ज्या शिल्पा शेट्टीच्या पतीने ब्लू फिल्म तयार केल्या त्या शिल्पा शेट्टी सोबत देवेंद्र फडणवीस उभे राहतात," असा घणाघात यशोमती ठाकूर यांनी केला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT