Dhule Politics Kunal Patil Join BJP saam Tv
महाराष्ट्र

Kunal Patil Join BJP: धुळ्यात काँग्रेसला खिंडार; कुणाल पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश

Dhule Politics Kunal Patil Join BJP: भाजप प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत कुणाल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

Bharat Jadhav

तीन पिढ्या काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या घराला भेदण्यास भाजपला यश आलंय. आज कुणाल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करत हाती कमळ घेतलं. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत कुणाल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

काँग्रेसचे कट्टर समर्थक असलेले काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकला. कुणाल पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित झाल्यानंतर हजारो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले. या कार्यकर्त्यांमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, बाजार समिती संचालक तसेच अनेक विद्यमान सरपंच आणि उपसरपंच यांचा समावेश आहे.

धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचा चेहरा म्हणून कुणाल पाटील यांच्याकडे पाहिलं जातं. तसेच कुणाल पाटील राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आहेत. माजी आमदार कुणाल पाटील यांचा १ जुलै रोजी भाजपमध्ये प्रवेश झाला. या पक्ष प्रवेशामुळे धुळे जिल्ह्यातून राजकीय घडामोडींना वेग आलाय. कुणाल पाटील यांचा भाजप प्रवेश काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातोय. तर भाजपला यामुळे धुळे जिल्ह्यात नवसंजीवनी मिळेल असं राजकीय जाणकार सांगत आहेत.

का सोडला काँग्रेस पक्ष?

उत्तर महाराष्ट्र काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण याच उत्तर महाराष्ट्राकडे काँग्रेसचे दुर्लक्ष झालंय. इंदिरा गांधी महाराष्ट्रातील प्रचाराची सुरुवात उत्तर महाराष्ट्रातून करत. मात्र आता या भागाकडे पक्षाचे लक्ष राहिलं नाहीये. २०१४ मध्ये मोदी लाट असतानाही कुणाल पाटील यांनी याच भागातून निवडणूक लढवली होती आणि जिंकले होते.

काँग्रेसचा थेट जनतेशी संपर्क कमी कमी होत गेलाय, असे सांगत काँग्रेस नेते कुणाल पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून कुणाल पाटीलभाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. आता खुद्द कुणाल पाटील यांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे.

आपला जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्रातील विकासाचा बॅकलॉग भरून काढायचा असल्यानं आपण भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. गेल्या १० भाजपने देशात ज्या पद्धतीने विकास केलाय. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकासाचे वातावरण निर्माण झालंय. प्रलंबित प्रश्नांना सोडवण्याचे काम सुरू आहे. हे सर्व वातावरण पाहता कार्यकर्त्यांमध्ये आणि स्थानिक सर्वसामान्य जनतेत भावना निर्माण झाली. आपणही विकासाच्या प्रवाहात आपल्याला राहिले पाहिजे, असं कुणाल पाटील पक्षप्रवेश करण्याआधी म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले; ७५% लोकांची पसंती|VIDEO

Shocking News : दहावीच्या विद्यार्थिनीने शाळेतच आयुष्य संपवलं, चौथ्या मजल्यावरून मारली उडी

Mumbai To Amravati: मुंबईहून अमरावतीपर्यंत प्रवास करायचा आहे? जाणून घ्या सर्वोत्तम मार्ग आणि महत्त्वाचे टिप्स

भीषण ! डीएसपी रँकच्या २ पोलीस अधिकाऱ्यांच्या अपघातात मृत्यू

Rule Change: LPG गॅस, UPI ते क्रेडिट कार्ड...; १ ऑगस्टपासून ६ नियमांत होणार मोठे बदल

SCROLL FOR NEXT