Rahul Bondre may join BJP from Buldhana latest political news 
महाराष्ट्र

काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का; प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यातील माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश?

Maharashtra Politics : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या बुलडाणा जिल्ह्यात भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ची चर्चा रंगली आहे. चिखलीचे माजी काँग्रेस आमदार राहुल बोंद्रे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची राजकीय चर्चा सुरू आहे.

Bharat Jadhav

  • काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली आहे.

  • राहुल बोंद्रे हे चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी काँग्रेस आमदार आहेत.

  • भाजप प्रवेशाबाबत अधिकृत घोषणा होणे बाकी असून सध्या ही राजकीय चर्चा आहे.

बुलडाणा जिल्ह्यातच काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या जिल्ह्यातच भाजप ऑपरेशन लोट्स राबवणार असल्याची चर्चा सध्या जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. चिखली विधानसभेचे काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे हे भाजपच्या वाटेवर असल्याचं सांगितलं जातंय.

राहुल बोंद्रे यांच्या संभाव्य पक्षांतरामुळे बुलडाणा जिल्ह्यातील काँग्रेसच्या राजकारणाला मोठा धक्का बसणार आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याच जिल्ह्यात काँग्रेसमधील बड्या नेत्याच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाल्याने या घडामोडींकडे राज्याचे लक्ष लागले आहे. बोंद्रे हे चिखली मतदारसंघातील काँग्रेसचे प्रमुख नेते राहिले आहेत. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास चिखलीसह बुलडाणा जिल्ह्यात काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसेन.

राहुल बोंद्रे यांनी विश्वासार्ह कार्यकर्त्यांची बैठक घेतली

राहुल बोंद्रे यांनी त्यांच्या चिखली विधानसभा मतदारसंघातील काही प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत आगामी राजकीय वाटचालीबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जातंय. त्यामुळे बोंद्रे यांच्या पक्षांतराच्या चर्चांना आणखी बळ मिळालंय. दोन दिवसांपूर्वी राहुल बोंद्रे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांची भेट घेतली होती.

एकीकडे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याची भेट आणि दुसऱ्या बाजूला मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक यामुळे बोंद्रे नेमकी कोणती भूमिका घेणार याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लालबागच्या राजाच्या मंडपात अचानक शॉर्टसर्किट; मोठ्या ठिणग्यांनी भाविकांमध्ये घबराट|VIDEO

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा हादरा! बडा नेता भाजपच्या वाटेवर; पक्षप्रवेशाची तारीख ठरली

Maharashtra News Live Update: 7 दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर कोकणवासीयांचा परतीचा प्रवास

बंद असलेले सर्व कबुतरखाने तातडीने सुरू करा; अन्यथा... जैन मुनींचा विधानसभा अध्यक्षांना इशारा

Monday Horoscope: नवीन जबाबदारीपासून आर्थिक नियोजनापर्यंत; वाचा तुमचं राशीभविष्य काय सांगतं?

SCROLL FOR NEXT