Maharashtra Politics saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: CM शिंदे, फडणवीस, अजित पवार आणि अशोक चव्हाण एकाच मंचावर येणार, नेमकं काय आहे कारण?

Beed News: राज्याच्या राजकारणातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकाच मंचावर येणार असल्याने ते काय बोलणार याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Vinayak Mete Jayanti Program: राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. महाविकास आघाडी आणि भाजप -शिवसेना (शिंदे गट) युतीकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. अश परिस्थितीत महाविकासआघाडीतील महत्वाचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे दिग्गज नेते लवकरच एकाच मंचावर येणार आहेत.

शिवसंग्रामचे अध्यक्ष दिवंगत विनायकराव मेटे यांची येत्या 30 जूनला जयंती आहे. या निमित्ताने बीडमध्ये शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांसह ज्योती विनायक मेटे यांच्याकडून त्यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

दिवंगत विनायकराव मेटे यांच्या या जयंतीच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम शिवसंग्रामकडून घेतले जात आहेत. यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांच्यासह राज्याच्या राजकारणातील मातब्बर नेते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ज्योती मेटे यांनी बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. (Marathi Tajya Batmya)

त्या म्हणाल्या, येत्या 30 जूनला विनायक मेटे यांच्या समाधी स्थळावर अभिवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या जयंतीनिमित्त अभिवादनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह सर्वच पक्षातील नेत्यांना निमंत्रण दिले आहे. (Latest Political News)

या कार्यक्रमासाठी राज्याच्या राजकारणातील दिग्गज नेते येणार असल्याने कार्यक्रमाची जंगी तयारी देखील शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. याबाबत ज्योती मेटे यांनी शिवसंग्राम भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. यानिमित्ताने राज्याच्या राजकारणातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकाच मंचावर येणार असल्याने ते काय बोलणार याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विलास घुले हत्या प्रकरणात एका संशयताला SIT ने घेतले ताब्यात

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

कितीही खासदार फोडा, उरावर भगवा फडकवणार, ओमराजेंच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडली

Spring Roll Recipe: घरच्या घरी बनवा टेस्टी स्प्रिंग रोल; वाचा सोपी रेसिपी

केतनच्या हत्येमागचं डिजिटल कनेक्शन उघड, गुगलवर शोधले पर्याय, लोहगडावर सराव

SCROLL FOR NEXT