Devendra Fadnavis on CM Eknath Shinde Resign Maharashtra Political Crisis Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मुहूर्त ठरला! 'या' दिवशी होणार मंत्रिमंडळ विस्तार; भावी मंत्र्यांची नावेही समोर?

Maharashtra Cabinet Expansion: न्यायालयाच्या निकालानंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे वेध भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना लागले आहे.

सुरज सावंत

Maharashtra Politics News: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे वेध भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना लागले आहे. न्यायालयाच्या निकालाने शिंदे- फडणवीस सरकारला अभय मिळाल्यानंतर आत्ता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. याबाबतची सर्वात मोठी अपडेट समोर आली नसून मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखेसह संभाव्य मंत्र्यांची नावेही समोर आली आहेत.

या दिवशी होणार मंत्रीमंडळ विस्तार...

याबाबत अधिक माहिती अशी की, सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयानंतर राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचे शिंदे- फडणवीस सरकारकडून सांगण्यात येत होते. ज्याची आता तारीखही समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे रखडलेल्या मंत्रि मंडळाचा विस्तार हा २३ किंवा २४ मे ला घेण्याची चर्चा दबक्या आवाजाने आमदारांमध्ये सुरू आहे.

संभाव्य मंत्र्यांची नावेही समोर...

तसेच या मंत्रिमंडळ विस्तारात भरत गोगवले( जलसंधारण मंत्री), संजय शिरसाठ (परिवहन किंवा समाज कल्याण) बच्चू कडू (दिव्यांग मंत्री)प्रताप सरनाईक , सदा सरवणकर, यामिनी जाधव, अनिल बाबर, चिमन आबा पाटील या आमदारांची वर्णी लागण्याचीही चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाल्याचे बोलले जात आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत सर्व मिळून 50 आमदार आल्याने प्रत्येकालाच महत्त्वाकांक्षा, मंत्रीपदाची अपेक्षा होती. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात मात्र अनेकांचा अपेक्षाभंग झाला. काहींनी जाहीर नाराजीही व्यक्त केली. यात संजय शिरसाट तसेच बच्चू कडू यांचाही समावेश आहे. आता २८ जागा रिक्त आहेत. त्यामुळे आता कोणा कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.. (Maharashtra Politics)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राजभवनात 'मोदीज मिशन' पुस्तकाचं प्रकाशन

Satara News : डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणी महत्वाची अपडेट; पोलिसांकडून आरोपी PSI गोपाल बदनेवर मोठी कारवाई

Papad Recipe : रोज भाजी खाऊन कंटाळलात? मग कुरकुरीत पापडापासून बनवा 'हा' पदार्थ

Friday Horoscope: शुक्रवारची सुरुवात धमाकेदार बातमीने होईल, हाती आलेला पैसा जाण्याची शक्यता; वाचा राशीभविष्य

Heart Disease: कमी झोपेमुळे तुम्हीच देताय हार्ट अटॅकला आमंत्रण, ह्रदयाचे आणि झोपेचे नाते काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT